Hingoli Ncp News : अजितदादांनी फोन करून बोलावून घेतले, तरी आमदार नवघरे शरद पवारांसोबत

Ncp : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. पण, अजित पवार यांचे समर्थक नाहीत.
Hingoli Ncp News
Hingoli Ncp NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा गट आहे. यामुळे अजित पवार यांना जिल्ह्यात बळकटी नाही, असे असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे शनिवारीच मुंबईला गेले. (Hingoli Ncp News) पक्षातील घडामोडीविषयी आज त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

Hingoli Ncp News
Parbhani Ncp News : ज्येष्ठ नेत्यांची पवारांना साथ, तरुणांचा ओढा अजितदादांकडे.. .

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ncp) विचार केला तर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे जिल्ह्यातील मोठे नेते असून ते शरद पवार समर्थक आहेत. त्यामुळे ते (Ajit Pawar) अजित पवारांकडे जाण्याची शक्यता कमीच आहे. पण, वसमतचे आमदार नवघरे काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नवघरे यांना अजित पवारांनी वैयक्तिक फोन करून मुंबईला बोलावून घेतल्याचे सांगितले जाते.

शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही विश्वासू म्हणून नवघरे ओळखले जातात. शपथविधी सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे ते अजित पवारांसोबत असल्याची चर्चा सुरू झाली होती. (Hingoli) पण मुंबईहून मतदारसंघात परतताच त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर अजित पवारांसोबत न जाता शरद पवारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत वसमतमधून महाविकास आघाडीचे उमेदवार तेच असतील हे स्पष्ट झाले आहे.

त्यांचा सामना मतदार संघात इच्छुक असलेले शिवसेनेचे (शिंदे गट) राजू चापके यांच्याशी होवू शकतो.आमदार नवघरे अजित पवारांसोबत गेले असते तर चापके यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले असते असे देखील बोलले जात होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. पण, अजित पवार यांचे समर्थक नाहीत, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे.

आता जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रमुख गट असणार आहेत. शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा भाजपला होणार आहे. काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव आणि ज्येष्ठ नेते भाऊराव पाटील गोरेगावकर हेही या दुफळीचा फायदा पक्षाला करून घेण्याचा प्रयत्न करतील, हे निश्चित.

Hingoli Ncp News
Ambadas Danve On Sanjay Shirsat : अजित पवार सरकारमध्ये, आता मिंधे गट सत्तेतून कधी बाहेर पडणार ?

दरम्यान, राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्येकर्ते, विविध सेलचे प्रमुख, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदींच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावेळी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. आमदार राजू नवघरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब आहे. त्यामुळे सर्वांचे मत घेऊन ज्यांनी मला निवडून दिले, त्या प्रमाणे मी शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांसोबतच आहे.

जे माझ्या मनात होते तेच सर्वजण येथे बोलले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत. त्यांच्यामुळे राज्याची ओळख आहे. यामुळे हिंगोली जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ज्यांना शरद पवार यांचे नेतृत्व मान्य आहे, त्यांनी हातवर करावे, असे आवाहन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी करताच सर्वांनी समर्थन दिले. या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा ठराव दांडेगावकर यांनी घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com