Ambadas Danve On Sanjay Shirsat : अजित पवार सरकारमध्ये, आता मिंधे गट सत्तेतून कधी बाहेर पडणार ?

Marathwada : राष्ट्रवादी पक्ष व अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे.
Ambadas Danve-Sanjay Shirsat
Ambadas Danve-Sanjay ShirsatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. (Ambadas Danve On Sanjay Shirsat) उपमुख्यमंत्री म्हणुन त्यांनी काल शपथ घेतली, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतल्या इतर ०८ आमदारांनी सुद्धा राज भवनात जाऊन मंत्री पदाची शपथ घेतली.

Ambadas Danve-Sanjay Shirsat
Nanded NCP News: नांदेडची राष्ट्रवादी मोठ्या साहेबांसोबतच, काहींचे तळ्यात-मळ्यात..

अजित पवार यांच्या या निर्णयानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (Shivsena) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर उपरोधिक टीका केली. शिरसाट यांच्या जुन्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली.

अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, पाठिंबा काढून घेऊ असे विधान शिरसाट यांनी केले होते. (Marathwada) दानवे यांनी नेमकं यावर बोट ठेवत शिरसाट यांना या विधानाची आठवण करून दिली.

दरम्यान, एक वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षातील आमदारांना निधीचे न्याय पद्धतीने वाटप करत नाहीत, असा आरोप शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांनी केला होता.

या कारणाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता तोच राष्ट्रवादी पक्ष व अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com