Parbhani NCP Politics : बनसोडेंकडे पालकत्व देत अजितदादांनी परभणीवरची पकड मजबूत केली..

Guardian Minister News : बाबाजानी दुर्रानी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार गटाला हा मोठा धक्का होता.
Parbhani Guardian Minister News
Parbhani Guardian Minister NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : अजित पवारांच्या नाराजी नाट्यानंतर अखेर आज बारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली. यात अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या समावेश आहे. (Parbhani Gurdian Minister News) अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या शपथविधी झाला. मात्र अजित पवार गटातील मंत्र्यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली नव्हती. परभणीच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री संजय बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Parbhani Guardian Minister News
Maharashtra NCP Politics : सरकारमध्ये राष्ट्रवादीची चलती, कानामागून आले अन् तिखट झाले...

संजय बनसोडे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar) अजित पवार गटाला बळ मिळणार आहे. महायुतीच्या जागावाटपात परभणीच्या जागेसाठी (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही असू शकते. याचे कारण असे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. विद्यमान खासदार संजय जाधव हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावंत आहेत.

इंडिया आघाडीमुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस त्यांच्यासोबत असणार आहे. मात्र तरीही यावेळेस त्यांना धनुष्यबाणाशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. (Parbhani) तर दुसरीकडे त्यांना भाजपचे पाठबळही नसणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजपची मते व प्रचार यंत्रणेचा निश्चितच फायदा होऊ शकतो. (Marathwada) राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला होता.

यात खासदार डॉ. फौजिया खान, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय भांबळे यांचा समावेश होता. तर माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी अजित पवार यांना साथ दिली. मात्र काही दिवसांपूर्वीच जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनी भूमिका बदलत अजित पवार यांच्याशी जुळवून घेतले.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव असलेले बाबाजानी दुर्रानी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार गटाला हा मोठा धक्का होता. मात्र दुर्रानी व राजेश विटेकर यांच्यातील बेबनाव पक्षाच्या अनेक कार्यक्रमात उघडपणे दिसून आला होता. दुर्राणी यांनी अंतर्गत गटबाजीला वैतागून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता.

Parbhani Guardian Minister News
Chandrakant Khaire On CM Shinde : मुख्यमंत्री अठरा तास फक्त सरकार राहणार की जाणार ? याचा हिशेब करतात...

सद्यस्थितीत दुर्राणी आणि राजेश विटेकर हे अजित पवार गटात असल्याने त्यांच्यात समन्वय ठेवून पक्ष संघटना मजबूत करताना पालकमंत्री बनसोडे यांचे संघटन कौशल्य पणाला लागणार आहे. याशिवाय विविध विकासकामासाठी निधी देताना विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीबाबत दुजाभाव होत असल्याचे खासदार संजय जाधव यांनी वारंवार बोलून दाखवले आहे.

तसेच शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत पालकमंत्री असतानाही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार परभणी महानगरअध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तक्रारीची तातडीने दखल घेत तोंडी आदेश देऊन निधीवाटपाच्या यादीला स्थगिती दिली होती. त्यामुळे निधीवाटप करताना पालकमंत्री बनसोडे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com