Chandrakant Khaire On CM Shinde : मुख्यमंत्री अठरा तास फक्त सरकार राहणार की जाणार ? याचा हिशेब करतात...

Marathwada Political News : इकडे रुग्ण दगावताहेत, राज्यातील नागरिक विविध प्रश्नांना, तोंड देतेय, याच्याशी मुख्यमंत्र्यांना देणे-घेणे नाही.
Chandrakant khaire News
Chandrakant khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यू तांडवानंतर सरकारवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठत आहे. (CM Eknath Shinde) कुणी आरोग्य, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतंय, तर कुणी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर बोट ठेवतंय. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.

Chandrakant khaire News
Ambadas Danve on Nanded : कोणाचा वाढदिवस होता की डॉक्टर गर्भवती महिलेला... ; दानवेंचा सवाल?

शिंदे गटाचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करतात असं अभिमानाने सांगत असतात. त्यांच्या या दाव्यावरच खैरेंनी बोट ठेवत मुख्यमंत्री अठरा तास काम करतात, पण काय करतात? तर फक्त हिशेब करतात, असा टोला लगावला आहे. (Shivsena) माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करतात, असा दावा करत विरोधकांना सुनावले होते.

या संदर्भात खैरे (Chandrakant Khaire) यांनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री अठरा तास फक्त हिशेब करतात, हे सरकार राहणार की जाणार? गेले तर काय करायचे? याचा तो हिशेब असतो, असा चिमटा खैरेंनी काढला. सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दोन दिवसांपासून ज्या बैठका सुरू आहेत, त्या सरकार राहते की जाते? यावरच चर्चा सुरू आहे. सरकार पडले तर मग काय करायचे? यावरच या बैठकांमध्ये विचारमंथन सुरू आहे.

इकडे रुग्ण दगावताहेत, राज्यातील नागरिक विविध प्रश्नांना, अडचणींना तोंड देतेये, याच्याशी मुख्यमंत्र्यांना काहीही देणे-घेणे नाही. ते फक्त सरकार टिकवण्यासाठीच आपला सगळा वेळ खर्ची घालत आहेत, अशी टीकाही खैरे यांनी केली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आता नागपूरच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी एकाच दिवसात अनेक रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवरून राज्यातील वातावरण तापले आहे. हाफकिनकडून होणारी औषध खरेदी एका वर्षापासून बंद आहे.

मुख्यमंत्र्यांच्या समितीकडून औषध खरेदी करणारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. परिणामी ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आता नागपूरमध्ये रुग्ण दगावल्याचे समोर येत आहे. सरकारने नेहमीप्रमाणे चौकशी समिती नेमूण कारवाईचे आश्वासन दिले आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण दगावण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय यामध्ये नवजात बालकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे आरोग्य विभाग आणि सरकारविरोधात सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही सुरू झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com