Ajit Pawar News : बीडच्या गुंडगिरीला अजित पवार लगाम कसा घालणार ?

Guardian Minister Ajit Pawar to visit Beed for the District Planning Committee amid rising concerns over goondaism. Will he take action? : डीपीसी बैठकी शिवाय परळी, अंबाजोगाई, गेवराईचाही ते दौरा करणार आहेत. शिवराज दिवटे याला परळीतच मारहाण झाली असल्यामुळे पवारांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
Ajit Pawar Beed Tour News
Ajit Pawar Beed Tour NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचे धनंजय मुंडे कनेक्शन आणि यातून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यातील भ्रष्टाचार, गुंडगिरी संपवून बीडला सुतासारखं सरळ करण्यासाठी अजित पवार यांनी स्वतः जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. तीन महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातील गुंडगिरी, मारहाण, गँगवार थांबलेले नाही. शुक्रवारी शिवराज दिवटे या युवकाला अपहरण करून दहा-ते बारा जणांनी बेदम मारहाण केली. तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी आरोपींनी दिली.

यावरून जिल्ह्याचे वातावरण तापले आहे, परळी तालुक्यात रास्तारोको करण्यात आला, तर उद्या बीड बंदची हाक देण्यात आली आहे. शिवराज दिवटे याच्या भेटीला खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील जाऊन आले. परळीतील एकहाती सत्तेचा हा माज आहे, असे सोनवणे म्हणाले, तर मनोज जरांगे पाटील यांनी आता आम्ही शांत बसणार नाही, गुंडांचा माज संपवणारच, असा इशारा दिला. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही त्यांनी टीका केली. या पार्श्वभूमीवर उद्या (ता.19) रोजी अजित पवार बीड दौऱ्यावर येत आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी शिवाय परळी, अंबाजोगाई, गेवराईचाही ते दौरा करणार आहेत. शिवराज दिवटे याला परळीतच मारहाण झाली असल्यामुळे अजित पवारांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Beed News) तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दिवटे याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या दौऱ्यात ते शिवराज दिवटेची भेट घेतात का? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.

Ajit Pawar Beed Tour News
Manoj Jarange Patil On Shivraj Divate : आता किती दिवस शांत राहायचे, गुंडांचा माज उतरवणारच ! मनोज जरांगे पाटील संतापले

परळी, अंबाजोगाई व गेवराईचा दौर करत ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करणार आहेत. अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतल्याने जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात 91 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागच्या वर्षी जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखडा 484 कोटी रुपयांचा होता. आता यात वाढ हेाऊन 575 कोटी रुपयांचा झाला आहे. या विकास निधीचे नियोजन डीपीसी बैठकीत केले जाणार आहे.

Ajit Pawar Beed Tour News
Suresh Dhas News : वाल्मीक कराडची बी गँग अ‍ॅक्टिव्हच! शिवराज दिवटेला मारहाण करणारे त्यांचेच लोक

पवार परळीतील वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकास आराखड्याची पाहणी करणार असून अधिकाऱ्यांकडून आढावाही घेणार आहेत. त्यानंतर ते अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील नव्याने उभारलेल्या इमारतींची पाहणी आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व सर्जिकल वार्डचे लोकार्पण करतील. यानंतर दुपारी दिड वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. त्यानंतर ते जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा आणि विकास कामांच्या आढाव्यांच्याही बैठका घेणार आहेत.गेवराईतील विकास कामांचे भूमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते रात्री साडे सात वाजता होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com