Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी मानले अजितदादांचे आभार! ही फक्त एक घोषणा नाही, तर दिलेली ही संधी...

Dhananjay Munde Thanks Ajit Pawar for Development: अजितदादा बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला जात असताना मुंडे यांनी टि्वट करीत अजितदादांचे आभार मानले आहे.
Dhananjay Munde-Ajit Pawar
Dhananjay Munde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहे.‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी 191 कोटींच्या खर्चाने हा प्रकल्प बीडमध्ये उभारणार असून, दरवर्षी 7 हजार युवकांना मोफत जागतिक दर्जाचं औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यांचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते होत आहे.

यानिमित्ताने अजितदादा बीडच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला जात असताना मुंडे यांनी टि्वट करीत अजितदादांचे आभार मानले आहे.

मी, बीड जिल्ह्याचा माजी पालकमंत्री आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून, मा. अजितदादांचे मन:पूर्वक आभार मानतो. हा प्रकल्प फक्त एक घोषणा नाही, तर बीडच्या भविष्यासाठी दादा दिलेली संधी आहे! असे मुंडे यांनी एक्सवर म्हटलं आहे.

भगवान गडावर आज भाजपचे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट होणार आहे. याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Rohit Pawar : रोहित पवार करणार अजितदादांचे स्वागत; कर्जत जामखेडमध्ये बॅनर झळकले!

काय म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी...

बीड जिल्ह्यातील युवकांसाठी ऐतिहासिक पाऊल... जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी बीड जिल्ह्याला दिला रोजगाराचा मजबूत आधार! राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून आणि त्वरित निर्णयक्षमतेमुळे अवघ्या दोन आठवड्यांतच बीड जिल्ह्यासाठी ‘सीआयआयआयटी’ (Center for Invention, Innovation, Incubation & Training) प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी 191 कोटींच्या खर्चाने हा प्रकल्प बीडमध्ये उभारणार असून, दरवर्षी 7 हजार युवकांना मोफत जागतिक दर्जाचं औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. या प्रकल्पामुळे युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी खुले होतील,बीडमध्ये उद्योगांना चालना मिळेल, जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरणाची पायाभरणी होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com