Beed : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. धगन भुजबळांचा येवला, धनंजय मुंडेंच्या बीडनंतर आता पवारांची पुढची सभा ही मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोल्हापूरमध्ये होत आहे. तर आता पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आता अजित पवार गट देखील मैदानात उतरणार आहे.
याचाच भाग म्हणून आता उपमुख्यमंत्री अजित पवारां(Ajit Pawar) ची येत्या २७ ऑगस्टला बीडमध्ये सभा होत आहे. या सभेचा टीझर स्वत : धनंजय मुंडें(Dhananjay Munde)नी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. विशेष म्हणजे सभेच्या टीझरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या सभेचा टीझर ट्विट केला आहे. यात त्यांनी जाहीर सभा...! सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन दुष्काळ मिटवण्याची...! मी येतोय, तुम्ही येताय ना...? अशी टॅगलाईन देत सभेचा टिझर प्रसिध्द केला आहे. पण या टीझरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरण्यात आलेला नाही.
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी बॅनर, पोस्टरवर माझा फोटो वापरला तर (Sharad Pawar) थेट कोर्टात खेचेल असा इशारा अजित पवार गटाला दिला होता. या इशाऱ्यानंतरही अजितदादा गटाचे कार्यकर्ते, नेते उत्साहाच्या भरात बॅनरवर शरद पवार यांचे फोटो लावतच होते. आता मात्र, अजित पवारांच्या गटातील वरिष्ठ नेत्यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. शरद पवार यांचा फोटो कुणीही वापरू नये, अशा सूचनाच वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते..?
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले फोटो अजित पवार गटाने वापरू नये, फ्लेक्स बॅनरवर ते छापू नये असे स्पष्ट केले होते. जर तरीही माझे फोटो ते वापरत असतील तर मग आता आम्ही कोर्टात जाणार असल्याचा इशाराच पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देऊन टाकला होता.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.