Ajit Pawar Pune Daura: अजित पवार शुक्रवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर; पदाधिकारी करणार जंगी स्वागत

Pimpri-Chinchwad : नव्या राजकीय समीकरणानंतर अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय आदेश देणार ?
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यातील सत्तेत सामील होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे त्यांच्या आवडत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर शुक्रवारी येत असून पावणेदोन महिन्यांनंतर त्यांचा हा दौरा आहे. नव्या राजकीय समीकरणानंतर ते यावेळी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय नवा आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमासाठी 6 ऑगस्टला ते उद्योगनगरीत तेवढ्यापुरते आले होते. ती त्यांची धावती भेट होती. शहराचा खास दौरा नव्हता. उद्याची अधिकृत पहिली शहर भेट असल्याने त्यांच्या स्वागताची राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. मुंबईहून बाय रोड येणाऱ्या अजितदादांचे सकाळी नऊ वाजता शहरात प्रवेश करताना मुकाई चौक, रावेत येथे स्वागत केले जाणार आहे.

Ajit Pawar
Nana Patole Onion Issue : कांदा शुल्क केंद्राकडून रद्द करुन घेण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये हिम्मतच नाही, नाना पटोलेंचा हल्लाबोल

त्यानंतर ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाऊन आढावा बैठक घेतील. पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्या कारभारावर शहरातील राष्ट्रवादी नाराज असून ती त्यांनी अजित पवारांपर्यंत यापूर्वीच पोचवली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत ते पालिका प्रशासनाला आपल्या पद्धतीने समजावून सांगतील, अशी चर्चा आहे.

Ajit Pawar
Raj Thackeray News : जेव्हा राज ठाकरे छोट्या राजच्या हट्टासाठी खास मुंबईहून दापोडीत येतात...मनसैनिकाच्या मुलासाठी सरप्राईज

२०१७ पर्यंत पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. २०१७ ला भाजप प्रथमच तेथे सत्तेत आली. दरम्यान, आतापर्यंत विरोधक असलेले हे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र सत्तेत आले आहेत. त्यातून ते पिंपरी महापालिकेची आगामी निव़डणूक एकत्र लढणार आहेत.

त्यासाठी ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय नवा आदेश चिंचवडच्या मेळाव्यात देतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. हा मेळावा प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात होणार असून याच ठिकाणी अमित शाहांचा सहा ऑगस्टचा कार्यक्रम झाला होता.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com