Ajit Pawar News : बीडचे पालकमंत्री का झालात ? अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले!

Ajit Pawar's convoy was shown black flags during his visit to Jalna, creating a significant political stir. Read more about the incident and the reactions. : अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारले, एका अर्थाने ते धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत भारतीय मराठा महासंघाने अजित पवारांचा निषेध नोंदवला.
DCM Ajit Pawar News
DCM Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

उमेश वाघमारे

Jalna Protest News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाहीये,या घटनेचा निषेध आणि अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद का स्वीकारले? असे म्हणत मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जालना शहारातील भोकरदन नाका तेथे काळे झेंडे दाखवत आंदोलन केले.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी अखिल मराठा महासंघाच्या वतीने उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले.अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले याचाही आंदोलकांनी निषेध केला.

DCM Ajit Pawar News
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : तर.. 'लाडक्या बहि‍णीं'ना यापुढे पैसे मिळणार नाहीत; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले!

सरपंच संतोष देशमुख खून प्रकणात आरोप होत असलेले मंत्री धनंजय मुंडे त्यांच्याच पक्षाचे आहेत. खून प्रकरणाचा तपास हा कुठल्याही राजकीय दबावाशिवाय होण्यासाठी (Beed) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे दुसऱ्या नेत्याकडे द्यायला हवे होते. परंतु अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारले, एका अर्थाने ते धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत भारतीय मराठा महासंघाने अजित पवारांचा निषेध नोंदवला.

DCM Ajit Pawar News
Beed Guardian Minister: अजितदादा की धनुदादा...; पडद्यामागचे पालकमंत्री कोण?

अजित पवार यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांना पालकमंत्री पद द्यायला हवे होते. यासाठी आम्ही अजित पवार यांन काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याचे आंदोलक अरविंद देशमुख यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार जालन्यात आले होते.

DCM Ajit Pawar News
Jalna Political News : पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राखावी लागणार 'भाऊ'अन् 'दादां'ची मर्जी!

भोकरदन नाका येथे अचानक त्यांच्या ताफ्यासमोर चार-पाच आंदोलक आले आणि त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना रोखत पोलिसांनी अजित पवारांच्या ताफ्याला मार्ग करून दिला. अवघ्या काही मिनिटांच्या या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

DCM Ajit Pawar News
NCP on Mahayuti : सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याकडून महायुती सरकारवर टीकास्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाणार? याची उत्सूकता लागलेली असतांना अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांनीच या जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली. परंतु धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठीच त्यांनी पालकमंत्री पद स्वीकारल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com