Ajit Pawar Death : अजितदादांचे बीड अन् मराठवाडा सुधारणेचे स्वप्न अपुरेच राहिले; बारामती-पिंपरी चिंचवडसारख्या विकासाचा दिला होता शब्द

Marathwada, Beed Development Ajit Pawar Vision : बारामती-पिंपरी चिंचवडसारखा विकास मराठवाड्यात करण्याचे अजित पवारांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिले. बीडसह संपूर्ण मराठवाड्याने एक निर्णायक विकासनेतृत्व गमावले.
Deputy CM Ajit Pawar during a Marathwada visit, outlining his vision to develop Beed and other districts on the Baramati–Pimpri Chinchwad development model.
Deputy CM Ajit Pawar during a Marathwada visit, outlining his vision to develop Beed and other districts on the Baramati–Pimpri Chinchwad development model.Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मराठवाड्याचा विकास बारामती-पिंपरी चिंडवडसारखा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बीड जिल्ह्याचे पालकत्व हाती घेतल्यानंतर त्यांनी बारामती पॅटर्न राबवायला सुरूवातही केली होती. केवळ बीडच नाही तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यामध्ये त्यांना पिंपरी चिंचवड-बारामती सारखा विकास करायचा होता. पण आता त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी मराठवाड्याचे प्रश्न आणि विकासाचा अनुषेश भरून काढण्याच्या दृष्टीने कामाला सुरवात केली. मी काम करणारा माणूस आहे, मला जे माझ्या बारामतीत, पिंपरी चिंचवडमध्ये चांगल करता आलं ते इथे मराठवाड्यात करायचं आहे. पण त्यासाठी तुम्ही मला बळ दिलं पाहिजे, माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं अजित पवार सातत्याने सांगायचे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अजित पवारांनी सातत्याने मराठवाड्याचे दौरे केले. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये बरजेचे राजकारण करत नेत्यांना बळ दिले. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांच्यासारख्या नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेत पक्षाची मोठी ताकद उभी केली. हेच काम लातूरमध्ये झाले. ज्याचा चांगला परिणाम नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पहायला मिळाला.

Deputy CM Ajit Pawar during a Marathwada visit, outlining his vision to develop Beed and other districts on the Baramati–Pimpri Chinchwad development model.
Dhananjay Munde : "अजूनही वाटतंय दादांचा फोन येईल आणि म्हणतील धनंजय वेळेवर ये बरं का..." : धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

बीडला विकासाच्या ट्रॅकवर आणले..

गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात झालेल्या अनेक घडामोडींमुळे हा जिल्हा विकासाच्या मार्गावरून भरकटला होता. कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, गुंडगिरीमुळे जिल्ह्याची राज्यभरात बदनामी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असूनही हे सगळं घडत असल्याने अजित पवार व्यथित होते. पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी अजित पवार यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि झपाट्याने कामाला सुरवात केली.

Deputy CM Ajit Pawar during a Marathwada visit, outlining his vision to develop Beed and other districts on the Baramati–Pimpri Chinchwad development model.
Ajit Pawar यांचा दौरा ऐनवेळी रद्द; 1 हजार विकास कामांचं भूमिपूजन लांबणीवर ।Beed News।

जिल्हा नियोजन समितीमार्फत बीड शहरातील रस्त्यांसाठी निधी, जिल्हा परिषदे अंतर्गत साडेपाचशे कोटीहून अधिकचा निधी, रेल्वे, विमानतळासह आरोग्याच्या सुविधा, बीडचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलत बीडला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचे काम अजित पवारांनी जोरात हाती घेतले होते. नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांनी बारामती, पिंपरी चिंचवड सारखा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर लोकांनी विश्वास दाखवला आणि नगरपालिकेची सत्ता बीडच्या जनतेने त्यांच्या पक्षाच्या हाती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com