
Maratha reservation issue Maharashtra : मुंबई इथं आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करत कुणबी प्रमाणपत्राचं वाटपाची मागणी केली होती. जरांगे पाटील यांच्या मागणीवर महायुती सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढला.
जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार बीड जिल्हा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनात यशस्वी झाल्यानंतर, मराठा समाजातील लोकांना हैदराबाद गॅझेटियर लागू करताना, मराठावाडा मुक्ती संग्राम दिनी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वखालील राज्यातील भाजप महायुती सरकारने जरांगे पाटील यांची अपेक्षापूर्ती केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड (BEED) जिल्ह्यातील काही मराठा समाज लोकांना आज कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ज्या मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं, त्यांनी जरांगे पाटील यांचे आभार मानले. तसंच याचे सर्व श्रेय जरांगे पाटील यांना जात, अशी प्रतिक्रिया दिली. आता आमचा अनेक वर्षांचा संघर्ष संपला असून आमच्या स्वप्न पूर्ण झालं, अशी प्रतिक्रिया देखील कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळेल त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं असतानाच, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हिंगोली इथं कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले. परंतु मंत्री झिरवळ यांनी हैदराबाद गॅझेटियर न्यायालयात कितपत टिकेल, यावर विधान केल्याने खळबळ उडाली आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार की नाही, याबद्दल मंत्री झिरवळ यांनी साशंकता व्यक्त केली.
तसंच जरांगे पाटील यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे, यावर बोलताना मंत्री झिरवळ म्हणाले, "बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यायचे किंवा नाही हे कायदा ठरवेल. कारण संविधानात आणि हैदराबाद गॅझेटियरमध्ये काय आहे हे तपासावे लागेल. आदिवासी समाजाला देखील संविधानाचे संरक्षण आहे. प्रत्येक समाजाने शांततेने आंदोलन करायला पाहिजेत."
उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने ध्वजारोहणासाठी पोलिस मैदानाकडे जात असताना, दोन युवकांनी त्यांच्या ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने खळबळ उडाली. केज तालुक्यातील कुंभेफळ इथले हे युवक आहेत. कुंभेफळ ग्रामसभेची चौकशी करून कारवाईची प्रमुख मागणी आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघा युवकांना ताब्यात घेतले.
26 लाख लाडक्या बहिणींना भाऊ असल्याचा विश्वास देऊन मतं मिळवली. सत्तेचा मलिदा खाल्ल्यावर या लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार झाला, असा घणाघात करत बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अॅड. हेमा पिंपळे यांनी गळ्यात बाजरी ओबींच्या माळ घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन केले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असताना, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी या आंदोलनातून केली. जनसुरक्षा कायदा लादून लोकशाही दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकार आणि प्रशासन करत असल्याचा निषेधही करण्यात आला. सरकारने लोकांचा विश्वासघात केला असून, शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अॅड. हेमा पिंपळे केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.