
Beed News, 30 Jan : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. याच धगधगत्या बीडच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी (दि. 30) आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत आहे.
मागील काही दिवसांतील बीडमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता या बैठकीसाठी सर्वसामान्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, या बैठकीसाठी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) चुलत भाऊ अजय मुंडे यांना गेटवरच अडविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू असून पोलिस प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर आल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी सर्वसामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे या बैठकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली. मात्र, याचा फटका धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडे यांनाही बसल्याचं पाहायला मिळालं. कारण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अजय मुंडे आले असता पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याची सध्या बीडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
दरम्यान, बीड (Beed) जिल्हा नियोजन समितीमधून आमदार सुरेश धस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना हटवण्यात आलं आहे. विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणं धस आणि सोळंके यांना महागात पडल्याचं बोललं जात आहे.
बीडमध्ये आल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना इशारा दिला. ते म्हणाले, मागील काही दिवसांत बीडबाबतच्या (Beed) वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल. मात्र, तथ्य नसेल तर कारवाईचा प्रश्न येत नाही.
मी काम करताना कधीही जातीपातीचा विचार करत नाही. त्यामुळे जातीय सलोखा आपण ठेवला पाहिजे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र, जर कोणी एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, विकास कामे करताना कोणी खंडणी मागितली असेल तर मी मकोका लावायला देखील मागे पुढे बघणार नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.