Atul Save-Ajit Pawar News : लांबलांब राहणाऱ्या सावेंचे अजित पवारांनी खातेच लांबवले...

BJP : अतुल सावे हे निर्णय घेत नाही, फाईल दिली की, मी फडणवीसांना विचारतो असचं सागंतात, अशा शब्दात टीका केली होती.
Ajit Pawar-Atul Save News, Aurangabad
Ajit Pawar-Atul Save News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : शिंदे-फडणवीस सरकारचे बरे चालेले असतांना अचानक अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांची सत्तेत एन्ट्री झाली. (Atul Save-Ajit Pawar News) दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा असेच काहीसे शिंदे आणि भाजपच्या मंत्री आमदारांच्या बाबतीत घडले. पहिल्याच मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या अतुल सावे यांना थेट सहकार मंत्री करण्यात आले.

Ajit Pawar-Atul Save News, Aurangabad
Ajit Pawar Appreciation PM Modi : अजितदादांनी मोदींचं पुन्हा केलं कौतुक ; म्हणाले, 'मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही.."

२०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये त्यांना शवेटच्या दहा महिन्यात राज्यमंत्रीपद मिळाले होते. २०२९ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने (BJP)भाजपचे सत्ता स्वप्न भंगले आणि सावे यांना मिळणारी संधीही हुकली. अडीच वर्षानंतर शिंदेंचे बंड आणि झालेल्या सत्तांतरात पुन्हा फडणवीसांनी सहकार सारख्या महत्वाच्या खात्यासाठी अतुल सावे (Atul Save) यांचीच निवड केली.

या खात्याचा अनुभव आणि अभ्यास नसतांना सावे यांच्या गळ्यात हे खाते मारण्यात आले होते. केंद्रात नव्यानेच स्थापन झालेल्या आणि त्याचा कारभार थटे आपल्या हाती ठेवणाऱ्या अमित शहा यांच्याशी सावे यांचा संबध यायचा. (Ajit Pawar) त्यामुळे गेल्या वर्षभरात सावे यांनी सहकार खात्यात फारसे निर्णय घेतले नाही. जे झाले ते मंत्रीमंडळ बैठकीत ठरलेले आणि फडणवीसांच्या आदेशाने.

त्यामुळे सहकारमंत्री म्हणून सावे यांचे वर्षभरातील काम हे फार काही नजरेत भरणारे नव्हते. उलट कातडी बचाव धोरण ठेवल्यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे धनीच बनले. सहकारामध्ये अनुभव आणि दांडगा अभ्यास असलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी सावेंच्या कार्यपद्धतीवर थेट सावेंकडेच नाराजी व्यक्त केली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने भाजपच्या मंत्र्यांना इतिहासाची पुस्तके वाचण्यासाठी देत गांधीगिरी केली होती. तेव्हा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर अजित पवार यांनी अतुल सावे यांना थांबवत त्यांना गुलाबाचे फूल आणि पुस्तक भेट देत चिमटा काढला होता. ` अहो सावे साहेब एवढं लांब लांब राहात जावू नका, सत्ता येत असते, जात असते`, असा टोला लगावला होता.

Ajit Pawar-Atul Save News, Aurangabad
Ashok Chavan On Cabinet Expansion : अजितदादांकडे बोट दाखवून अशोक चव्हाणांनी शिंदेंच्या आमदारांना चुचकारले !

शिवाय अतुल सावे हे निर्णय घेत नाही, फाईल दिली की, मी फडणवीसांना विचारतो असचं सागंतात, अशा शब्दात टीका केली होती. आता सावेंकडचे हेत सहकार खात पुन्हा पश्चिम महाराष्ट्राकडे आणि राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटलांना देण्यात आले आहे. त्यामुळे लांबलांब राहणाऱ्या अतुल सावे यांचे अजित पवारांनी सहकार खातेच पळवले अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे. सावेंनी खाते गेले तरी त्रागा केला नाही, की नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासाठी `सुंठे वाचून खोकला गेला`, असे म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com