Ajit Pawar Appreciation PM Modi : अजितदादांनी मोदींचं पुन्हा केलं कौतुक ; म्हणाले, 'मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही.."

Nashik News : राज्यावर दुबार पेरणीचं संकट आहे.
PM Narendra Modi, Dy CM Ajit Pawar
PM Narendra Modi, Dy CM Ajit PawarSarkarnama

Nashik : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केले. "नरेंद्र मोदीसारखं दुसरं नेतृत्व देशात नाही," असे ते म्हणाले. आगामी काळात होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते नाशिक येथे बोलत होते.

अजित पवार हे 'शासन आपल्या दारी' च्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिक दौर्‍यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.अजितदादांनी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतूक केले. पंतप्रधानाची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार , आर्थिक मदतीसाठी केंद्राकडे प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

PM Narendra Modi, Dy CM Ajit Pawar
Maratha reservation : आरक्षणासाठी मराठा महासंघाचा पुन्हा एल्गार ; 'जंतरमंतर' वर आंदोलन..

जुलै महिना आला तरी राज्यात पुरेसा पाऊस नाही, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. यासंदर्भात सविस्तर आढावा त्यांनी घेतला आहे. पदभार स्विकारल्यानंतर मी अर्थ आणि इतर विभागांचाही आढावा घेतला असल्याची माहिती पवार यांनी या वेळी दिली. "नाशिक, पुणे जिल्ह्यातील धरणं भरलेली नाही.कोयना, उजनीमध्ये पाणी कमी आहे, त्यामुळे राज्यावर दुबार पेरणीचं संकट आहे, पाणी काटकसरीनं वापरणे गरजेचे आहे," असे पवार म्हणाले.

PM Narendra Modi, Dy CM Ajit Pawar
Lok Sabha elections 2024 : 'रिपोर्ट कार्ड' असमाधानकारक असलेल्या खासदारांना मिळणार 'नारळ' ; भाजपकडून उत्तरप्रदेशात..

राज्यात अजून समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पुरेशा पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. ग्लोबल वार्मिगमुळे हे संकट आले आहे. शेतकऱ्यांचे व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार अधिक लक्ष देणार आहे, असे अजितदादांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सर्वसामान्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये आल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केलेले आहे. यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्ज देखील लावण्यात आलेले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com