Omraje Nimbalkar : लोकांचे फोन उचलण्याशिवाय ओमराजेंनी काय काम केलं? अजित पवार गटाचे कळीच्या मुद्द्यावर बोट

Dharashiv Political News : महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी महायुतीत इच्छुकांच्या संख्येत वाढ
Omraje Nimbalkar
Omraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे अनेक मुद्द्यांवरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यातूनच धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकांचे फोन उलण्याशिवाय दुसरी काय कामे केली, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर-उमरगा महामार्गावरून खासदारांवर टीकेची झोड उठवली. Omraje Nimbalkar

सोलापूर -उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट स्थितीतील कामांमुळे शेकडो निष्पाप लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. विद्यमान खासदार पाच वर्षांत महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी निष्क्रीय ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार गटाचे) प्रदेश उपाध्यक्ष आणि लोकसभेसाठी महायुतीकडून इच्छुक प्रा. सुरेश बिराजदार यांनी केली. तसेच त्यांनी गल्लीबोळातले प्रश्न निश्चित मांडावेत, पण लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून स्वतःची जबाबदारी झटकू नये, असा हल्लाबोलही केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Omraje Nimbalkar
Lok Sabha Election 2024 : आता निवडणुकीतही गुजरात-महाराष्ट्र भेद; पटोलेंच्या निशाण्यावर मोदी-शाह, नेमका मुद्दा काय?

राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १८) प्रा. बिराजदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, धाराशिव जिह्यातून सोलापूर ते उमरगा (कर्नाटक हद्द) राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. परिणामी अनेक गावांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याकडे दुर्लक्ष करत थेट वसुलीसाठी टोल नाके सुरू करण्यात आले. याकडे मात्र खासदार ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) पाच वर्षांत दुर्लक्ष केले. त्यांनी महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी झटकून काम करायले हवे होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात दोन टोल नाके बंद करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका बिराजदारांनी केली.

कामात मात्र फारशी सुधारणा नाही, अजूनही पुलासाठी बांधलेल्या सळया गंजलेल्या स्थितीत आहेत. याचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याची गरज आहे, असे असतानाही बंद केलेले ते नाके पुन्हा कसे सुरू झाले, असा प्रश्नही बिराजदारांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधीने पाच वर्षांत केंद्रस्तरावरील दृष्टिक्षेपात दिसणारे एकही काम केले नाही. लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासंबंधी काहीच होऊ शकले नाही. मी सर्वसामान्यांचे फोन उचलतो, या मुद्द्यापेक्षा खासदारांनी लोकांसाठी काय केले, याचे उत्तर द्यावे, असे म्हणत बिराजदारांनी निंबाळकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Omraje Nimbalkar
Eknath Shinde On MNS : महायुतीत मनसे सहभागी होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले 'हे' संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com