Chhava Sanghatana Vs Ajit Pawar NCP : 'छावा'चं शेतकऱ्यांच्या पोरांना 'फर्मान'; अजितदादांचे लोकं मतासाठी आल्यावर...

Ajit Pawar NCP Will Be Questioned by Farmers – Vijaykumar Ghadge Appeal in Beed : राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्य हल्ल्यानंतर छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेले दिसतो आहे.
Chhava Sanghatana Vs Ajit Pawar NCP
Chhava Sanghatana Vs Ajit Pawar NCPSarkarnam
Published on
Updated on

NCP vote appeal controversy : सुरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हल्ल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध चांगलीच आक्रमक आहे. 'छावा'चे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बैठकांचा जोर वाढवला आहे.

'स्थानिक स्वराज्य संस्थां'च्या निवडणुकीच्या तोंडावर 'छावा' बैठकांमधून राजकीय वातावरण तापवत आहे, यात अजितदादांची राष्ट्रवादी 'टार्गेट' केली जात आहे. बीडमध्ये बैठक घेत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं मत मागायला आल्यावर शेतकऱ्यांच्या पोरांनी काय करायचं, यावर विजयकुमार घाडगे यांनी मोठं आवाहन केलं आहे.

विजयकुमार घाडगे यांनी बीडमध्ये छावा संघटनेनं बैठक घेत, कर्जमाफी, पीक विमा आणि शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरून वातावरण तापवत आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरून जाब विचारण्याची भाषा करत, अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी भाजप महायुती (Mahayuti) सरकारला इशारा दिला आहे.

विजयकुमार घाडगे म्हणाले, "शेतकरी (Farmer) कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हल्ला करतात. परंतु आता घोडा मैदान जवळ आहे. कर्जमाफी, शेतमालाला भाव आणि पिक विम्याच्या प्रश्नावर, आता अखिल भारतीय छावा संघटना लढा उभारणार आहे. गावागावात मतं मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना शेतकऱ्यांचे पोरं जाब विचारावा."

Chhava Sanghatana Vs Ajit Pawar NCP
Anna Hazare on Pune controversy : अण्णा हजारेंना 'पुणेरी टोमणे' झोंबले; म्हणाले, '10 कायदे आणले, नव्वदीत देखील करत राहायचं का?'

'कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे इतर प्रश्न न सोडवल्यास नेत्यांना गावबंदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी मैदानात यावं, असं आवाहन करतानाा, आम्ही पुढाऱ्यांना गाव बंद करणारच आहोत', असा इशारा विजयकुमार घाडगे यांनी दिला.

Chhava Sanghatana Vs Ajit Pawar NCP
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये आपले 7 आमदार, इथेही शक्ती लावा.. रायगडचं उदाहरण देत भुजबळांनी टाकला पालकमंत्रीपदाचा बॉम्ब

माणिकराव कोकाटे कृषिमंत्री असताना विधिमंडळात आॅनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी छावा संघटनेने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते उधळले. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होत छावाचे विजयकुमार घाडगे यांना जबर मारहाण केली. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला.

विजयकुमार घाडगे यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओनंतर राष्ट्रवादीवर चौहूबाजूने टीका झाली. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असताना, विजयकुमार घाडगे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर विजयकुमारे घाडगे आणि छावा संघटना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पिकविमा आणि शेतीमालाच्या भावासाठी चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप महायुती सरकारला, त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com