NCP News : नांदेडच्या राजकारणात सर्वाधिक 'इनकमिंग'वाला ठरतोय अजितदादांचा पक्ष!

माजी आमदार सुभाष साबणे यांचा नागपूरच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश झाला आणि जिल्ह्यात पक्षातील माजी आमदारांचे एक मोठे वर्तुळ पूर्ण झाले.
EX MLA Subhash Sabane Join NCP News
EX MLA Subhash Sabane Join NCP NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नांदेड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात सर्वाधिक इनकमिंग होत असून त्यात सुभाष साबणे यांचा मोठा प्रवेश झाला आहे.

  2. साबणे यांच्या प्रवेशामुळे पवार गटाला नांदेडमध्ये मोठा राजकीय बळकटी मिळाली आहे.

  3. या हालचालीमुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील राजकारणात नवे समीकरण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nanded Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांनी आपला सवता सुभा निर्माण केला. राज्याच्या सत्तेत जात त्यांनी बेरजेचे राजकारण केले. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अजित पवारांच्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हे घडतयं हे महत्वाचे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वात काम करणारे अनेक माजी आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.

विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधारमधून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानेच हे पंक्षातर झाले होते, असे खुद्द चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता यांनीच माध्यमांना सांगितले होते. पण हा सल्ला आणि चिखलीकरांचा निर्णय योग्य ठरला आणि ते विधानसभेवर निवडून गेले. आमदार झाल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विस्ताराची संपूर्ण जबाबदारी प्रताप पाटील चिखलीकरांवर टाकण्यात आली. त्यानंतर चिखलीकरांनी असा काही टाॅप गेअर टाकला, की जिल्ह्यात भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला.

माजी आमदार सुभाष साबणे यांचा नागपूरच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश झाला आणि जिल्ह्यात पक्षातील माजी आमदारांचे एक मोठे वर्तुळ पूर्ण झाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अजित पवारांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. लोकसभा निवडणुकीत नांदेड (Nanded)मधून भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. अशोक चव्हाण पक्षात आल्यानंतर हे घडले याबद्दल आश्चर्यही व्यक्त झाले. चव्हाण पक्षात आल्याने चिखलीकरांनी आपला मार्ग वेगळा केला.

EX MLA Subhash Sabane Join NCP News
NCP SP MLA News : पवारांच्या आमदाराची मागणी एकनाथ शिंदेंनी तातडीने मान्य केली; मतदारसंघात मंत्र्यालाही पाठविण्याचा निर्णय

मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे, भास्करराव पाटील खतगांवकर, ओमप्रकाश पोकर्णा, मोहन हंबर्डे अशा दिग्गजांना पक्षात आणत राष्ट्रवादीने जिल्ह्यात सगळ्याच पक्षांना धक्का दिला. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राष्ट्रवादीत दाखल झाले, पण त्याच्या झळा मात्र भाजपाला पर्यायाने जिल्ह्यातील नेते अशोक चव्हाण यांना अधिक बसल्या. सुभाष साबणे यांच्या पक्षप्रवेशाने आता राष्ट्रवादीतील माजी आमदारांची संख्या सहावर गेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक करण्याचा निर्धार अजित पवार यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हवाल्याने केला आहे.

EX MLA Subhash Sabane Join NCP News
Nanded Politics: युतीत समन्वय; आघाडीत गोंधळ! नांदेडमध्ये पक्ष पुनर्बांधणीसाठी नेत्यांची धावाधाव

अशोक चव्हाणांवर मात..

दुसरीकडे भाजपाचे जिल्ह्यातील नेते अशोक चव्हाण यांच्यावर प्रताप पाटील चिखलीकर यांनी सध्या तरी मात केल्याचे चित्र आहे. अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर अख्खी काँग्रेस रिकामी होईल, असा दावा केला जात होता. पण माजी आमदार अमरनाथ राजूकर, डी.बी.पाटील, दत्तात्रय पांडुरंग, पत्नी अमिता चव्हाण आणि विधानसभा निवडणुकीआधी जितेश अंतापूरकर, अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात माजी मंत्री डी.पी. सावंत सोडले तर मोठा मासा अशोक चव्हाण यांच्या गळाला लागलेला नाही. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काही मोठे चेहरे पक्षात आण्यात त्यांना यश मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

FAQ

प्र.1: सुभाष साबणे कुठल्या पक्षात प्रवेशले?
उ.1: ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात सामील झाले.

प्र.2: साबणे यांचा प्रवेश कुठे झाला?
उ.2: नागपूर येथील पक्षाच्या अधिवेशन कार्यक्रमात त्यांचा प्रवेश झाला.

प्र.3: या प्रवेशाचा कोणाला सर्वाधिक फायदा होईल?
उ.3: अजित पवारांच्या गटाला नांदेडमध्ये मोठा फायदा होईल.

प्र.4: नांदेड जिल्ह्यात अजित पवारांचा प्रभाव कसा आहे?
उ.4: सतत इनकमिंगमुळे त्यांचा प्रभाव वाढत आहे.

प्र.5: साबणे यांच्या प्रवेशामुळे काय नवे समीकरण घडू शकते?
उ.5: नांदेडच्या राजकारणात अजित पवारांचा गट अधिक बळकट होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com