Ajit Pawar News : पाणी मुरतंय कुठं ? चारशे कोटींची योजना २८०० कोटींवर गेली कशी ?

Aurangabad : राज्यात २० पैकी तीन मंत्री औरंगाबादचे, केंद्रात दोन मंत्रीपदे आहेत. तर आणखी काही फोनची वाट बघत आहेत.
Ajit Pawar News, Aurangabad
Ajit Pawar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : शहराला १५ दिवसांनी येणारे पाणी न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सात दिवसांनी मिळायला लागले. तुडूंब भरलेले जायकवाडी धरण जवळ असताना (Aurangabad)औरंगाबादकरांना पाणी मिळत नाही. तसेच, ४०० कोटींची पाणी योजना २८०० कोटींवर गेली. `नेमकं पाणी मुरतंय कुठं?` असा प्रश्‍न उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला.

Ajit Pawar News, Aurangabad
NCP News : विक्रम काळेंनी पुन्हा आळवला मंत्रीपदाचा राग, आधी चव्हाणांचे बघा, मग जमलं तर माझंही ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या निवडणूकांमध्ये उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवारांनी यश मिळवले. (Ncp) लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात बुधवारी (ता. ११) सकाळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी (Ajit Pawar) पवार बोलत होते. अजित पवार यांनी शहराच्या पाण्यावरून भाष्य करतानाच याला लोकप्रतिनिधी कि, मतदारांना दोष द्यायचा, ही शोकांतिका आहे.

राज्यात २० पैकी तीन मंत्री औरंगाबादचे, केंद्रात दोन मंत्रीपदे आहेत. तर आणखी काही कोट तयार ठेऊन मंत्रीपदासाठी फोनची वाट बघत आहेत. असा टोला पवारांनी संजय शिरसाटांना नाव न घेता लगावला. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षातील वाचाळवीरांना रोखून समज दिली पाहिजे. तसेच जगभरातील विद्यापीठे राज्यात येत आहेत. या काळात दर्जा टिकवून त्यांना सामोरे जाणे आव्हानात्मक आहे.

अनुदानित महाविद्यालयांसमोरही अडचणी आहेत. निवडून आलेल्या सदस्यांनी विद्यापीठात आता नवीन गोष्टी राबविणे गरजेचे आहे. असा सल्लाही पवार यांनी दिला. तर, उत्कर्षने सर्वसाधारण गटातही इतर समाज घटकांना प्रतिनिधित्व दिले. ही अभिमानास्पद आणि कौतुकाची बाब असल्याचे ते म्हणाले.

तर राज्यात १९९९ ला सरकार आल्यानंतर विद्यापीठ कायद्यात सुधारणा केली. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये उभारली. नंतरच्या सरकारने त्यात बदल केल्याने विद्यापीठातील सरकारच्या हस्तक्षेपाला वाव दिला आहे. आता विद्यापीठावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे. मनुवादी विचारांचा पराभव करण्यासाठी आपण आपल्या संस्थावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असा सल्ला माजी मंत्री दिलीप वळसे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com