Prakash Solanke : निवडणुकीत काय काय करावं लागंत; चपटी, कोंबडी, बकर अन् लक्ष्मीदर्शनही! प्रकाश सोळंके हे काय बोलून गेले ?

NCP MLA Prakash Solanke Viral Video : निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा सल्ला प्रकाश सोळंके यांनी जाहीर कार्यक्रमातून केल्याने ते आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकतो.
NCP MLA Prakash Solanke Statement News Beed
NCP MLA Prakash Solanke Statement News BeedSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अजित पवारांच्या एनसीपी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी “दारू, पैसे, कोंबडी, बकरा कापावा लागतो” असं वक्तव्य करत वाद ओढवून घेतला.

  2. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

  3. सोशल मीडियावर सोळंकेंच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून पक्ष नेतृत्वानेही स्पष्टीकरण मागितले आहे.

Local Body Election 2025 : निवडणुकीत काय काय करावं लागंत? कसं जिंकाव लागतं याचा अनुभव माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितला. कोणाला चपटी, कोणाला कोंबड तर काहीसाठी बकरं कापाव लागतं. तर काहींना लक्ष्मीदर्शनही घडवावं लागतं. माझ्या सगळ्या निवडणुका तुम्ही लढवल्या आहेत, तुम्हाला हे सगळं माहीत आहे. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार शंभर रुपये खर्च करणार असेल तर आपल्यालाही तशी तयारी ठेवावी लागेल, असं जाहीरपणे सांगत प्रकाश साळंके यांनी वाद ओढावून घेतला आहे.

माजलगाव येथे निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना प्रकाश सोळंके यांची गाडी सुसाट सुटली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ही विधानसभे पेक्षा जास्त ताकदीने लढवावी लागेल, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. इच्छूकांना हे सगळं करण्याची तयारी करावी लागेल आणि त्याची माहितीही आम्हाला द्यावी लागेल, असे प्रकाश सोळंके म्हणाले. निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा सल्ला प्रकाश सोळंके यांनी जाहीर कार्यक्रमातून केल्याने ते आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकतो. विरोधक सोळंके यांच्या या विधानवर तुटून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जय्यत तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. नुकतीच दिवाळी झाल्याने स्नेह मेळाव्यातून कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम सुरू आहे. शिवाय साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सहकार क्षेत्रातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात हंगामा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात चपटी द्यावी लागते, कोंबडं-बकरं द्यावं लागतं. तसेच नुसता निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नाही, तुमच्याकडे किती 'दारू'गोळा आहे याची माहिती द्या, असं वक्तव्य त्यांनी केले.

NCP MLA Prakash Solanke Statement News Beed
Prakash Solanke : राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंची खदखद; ‘माझ्या मंत्रिपदाला माझी जात आडवी येते’

आमदार प्रकाश सोळंके यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसं मतदान घेतलं हे त्यांना चांगलं माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबडं कापावं लागतं आणि कुणासाठी बकरं कापावं लागतं. कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. पण यात तुम्ही एक्सपर्ट बनलेले आहात.

NCP MLA Prakash Solanke Statement News Beed
NCP News : राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे आयोजन का केले? आयडिया कोणाच्या डोक्यात आली? 'ठुमक्यांची' Inside Story

माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत. आपण घेतलेला अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी नुसतं इच्छुक असून उपयोग नाही तर बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात असंही ते म्हणाले. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आपण त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाही. मात्र कुठेही कमी पडता कामा नये. विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागेल, चारपटीने कष्ट घ्यावे लागतील, असे आवाहन प्रकाश सोळंके यांनी केले.

FAQs

1. प्रकाश सोळंके यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
→ त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी “दारू, पैसे, कोंबडी, बकरा कापावा लागतो” असं वक्तव्य केलं.

2. हे वक्तव्य कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात केलं?
→ हे वक्तव्य त्यांनी स्थानिक निवडणुकीसाठीच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाषणादरम्यान केलं असल्याचं समोर आलं आहे.

3. या विधानावर पक्षाची काय भूमिका आहे?
→ अजित पवारांच्या पक्षाकडून या वक्तव्याची दखल घेऊन स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.

4. विरोधकांची प्रतिक्रिया काय आहे?
→ विरोधकांनी हे वक्तव्य लोकशाहीला अपमान करणारे असल्याचं सांगत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे.

5. सोशल मीडियावर या घटनेला काय प्रतिसाद मिळाला?
→ अनेकांनी या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com