NCP News : राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे आयोजन का केले? आयडिया कोणाच्या डोक्यात आली? 'ठुमक्यांची' Inside Story

NCP News : नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात झालेल्या लावणी सादरीकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनिल अहीरकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ठुमक्यांवर टाळ्या आणि जल्लोष केला.
Lavani performance lights up NCP’s Diwali Milan event at Nagpur party office.
Lavani performance lights up NCP’s Diwali Milan event at Nagpur party office.Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरमधील पक्ष कार्यालय सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी कार्यकर्त्यांसाठी पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या दिवाली मिलन कार्यक्रमात लावणीच ठुमके लागले. "मला जाऊ द्या ना घरी" या लावणीवर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताल धरला, टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज घुमला. ठुमके लावल्याचा हा व्हीडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

कार्यालयात असेच प्रकार सुरू राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा वाजायला वेळ लागणार नाही अशा खोचक प्रतिक्रिया यावर उमटत आहे. यासाठी पक्ष फोडला का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली असून ही गोष्ट निषेधार्ह आहे आणि कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वादानंतर आता या लावणीचे आयोजन का केले? ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या मंथन शिबिरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रसने संघटनेत मोठे फेरबदल केले. शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडून सूत्र काढून घेऊन अनिल अहीरकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. ग्रामीणच्या अध्यक्षपदी राजाभाऊ टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली. अलीकडचे अहीरकर यांनी शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

कार्यकारिणी जाहीर करताना पक्ष कार्यालयात मोजक्याचा पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. कार्यकारिणीवरून असंतोष उफाळू नये आणि कोणी जाहीरपणे याची वाच्यता करू नये याची खबरादारी मोजक्या लोकांना बोलावून घेण्यात आली असल्याची चर्चा आहे. यानंतर नव्याने अध्यक्षपद मिळाल्याने उत्साहात असलेल्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी दिवाळी मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Lavani performance lights up NCP’s Diwali Milan event at Nagpur party office.
NCP candidate announcement : अजितदादांची आघाडी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

याच दिवाळी मिलन कार्यक्रमात अनेकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. एका महिला कार्यकर्त्याने लावणी सादर केली. नेमक्या याच व्हीडीओने राष्ट्रवादी कार्यालय सर्वांच्या रडारवर आले आहे. अध्यक्षांना लावणीचाच कार्यक्रम घ्यायचा होता तर खाजगी सभागृहात करायला पाहिजे होता, पक्ष कार्यालयात कशासाठी अशी विचारणा केली जात आहे. अनिल अहीरकर यांनी मात्र ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हंटले.

Lavani performance lights up NCP’s Diwali Milan event at Nagpur party office.
Ajit Pawar NCP's Politics : जिल्हाध्यक्षांनी आमदार निकमांना तोंडावर पाडलं? म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्वबळाचा नारा फक्त अफवाच

अहीरकर म्हणाले, ती पक्षाची कार्यकर्ता आहे. तिनेच लावणी सादर करण्याचा निर्णय घेतला. हे काही अश्लील नृत्य नव्हते. पक्ष कार्यालयात व्यावसायिक कार्यक्रम आयोजित केला नव्हता. विशेष म्हणजे अध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी सायंकाळी सहा ते आठ ही वेळ निश्चित केली आहे. यावरूनही अहीरकर यांच्यावर टीका केली जात आहे. अध्यक्ष व्यावसायिक आहेत का? नियम येथे कसे काय लावले जाऊ शकतात? अध्यक्षांनी राष्ट्रवादीचे कंपनीकरण केले असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, या टीकांमुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन झाल्याने अहीरकर यांच्यासह उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आणि लावणी सादर करणाऱ्या महिलेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षाच्यावतीने अहीरकर यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा करावयाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी ही नोटीस बाजवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com