Uddhav Thackeray Sabha News : ठाकरेंच्या `निर्धार` सभेचा बोलबाला, प्रोमोतून निष्ठावंतांना साद..

Shivsena UBT : दोन्ही फूट पडलेल्या पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांच्या बीड आणि हिंगोली येथे एकाच दिवशी सभा.
Uddhav Thackeray Rally News
Uddhav Thackeray Rally NewsSarkarnama

Hingoli Political News : शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच हिंगोलीत येवून `निर्धार सभा`, घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. (Hingoli Rally News) या सभेच्या प्रोमोने सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. या प्रोमोमधून निष्ठावंतांना साद घालण्यात आली आहे. प्रभावी प्रोमोमुळे ठाकरेंच्या २७ ऑगस्ट रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानात होणाऱ्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray Rally News
Mp Imtiaz Jalil ON Railway Minister : रेल्वेचा थांबा मिळत नसेल तर रावसाहेब दानवेंच्या मंत्रीपदाचा काय फायदा ?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात हिंगोलीचे (Hingoli) खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे देखील सामील झाले होते. आता या निर्धार सभेतून ठाकरे पाटील-बांगरचा कसा समचार घेणार? याकडे निष्ठावंताच्या नजरा लागल्या आहेत. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांच्या हिंगोली येथील जाहीर सभेचा प्रोमो ठाकरे गटाकडून जारी करण्यात आला आहे.

`तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर` अशी उत्साह वाढवणारी साद आणि छंद आमचा जुना, नसानसांत शिवसेना निकराने लढू, गढ उभारू पुन्हा, अशा आश्वासक आवाहनामुळे सभेचे प्रोमो शिवसैनिकांच्या पसंतीला उतरला आहे. (Shivsena) हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहनही प्रोमोच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही फूट पडलेल्या पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांच्या बीड आणि हिंगोली येथे एकाच दिवशी सभा होणार आहेत. त्यामुळे सहाजिकच या सभांची आणि त्यातील भाषणांची तुलना केली जाईल. वर्षभरापुर्वी सत्तेत एकत्र राहिलेले उद्धव ठाकरे, अजित पवार आपापल्या भाषणातून एकमेकांवर निशाणा साधतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

हिंगोलीच्या रामलीला मैदानात दुपारी दोन वाजता होणाऱ्या ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंच्या बंडाला साथ देणारे खासदार हेमंत पाटील आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना धोबीपछाड देण्याचा निर्धार या सभेतून उद्धव ठाकरे करणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दुरध्वनीवरून हिंगोलीतील शिवसैनिकांशी संवाद साधला होता. मी तुमच्या भेटीला येईन, असा शब्दही त्यांनी दिला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com