Ajit Pawar : सावेसाहेब असं तुटक-तुटक रहायचं नसतं ; सत्ता येत असते जात असते..

Minster Atul Save : अतुल सावे यांनी नाही हो साहेब तसे काही नाही, असे म्हणत वेळ मारून नेली.
Ajit Pawar-Atul Save News, Aurangabad
Ajit Pawar-Atul Save News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Winter Session News : राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. Nagpur राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांना नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचा अनुभव आला. राज्यात महापुरूषांचा अवमान भाजप नेत्यांकडून सुरू आहे, यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी मंत्री, आमदारांना महापुरूषांच्या कार्याची महती सांगणारी पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम राबवला.

Ajit Pawar-Atul Save News, Aurangabad
Sanjay Raut : ‘संजूबाबा फेल’, स्वतंत्र विदर्भ राज्य डंके की चोट पे घेऊ...

सहकार मंत्री अतुल सावे हे सभागृहात जाण्यासाठी येत असतांना अजित पवारांनी त्यांना गाठले आणि पुस्तक आणि फुलं भेट दिले. हे देत असतांना (Ajit Pawar) अजित पवारांनी सावे यांना टोला देखील लगावला. ` सावेसाहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून फारच बदललात बाबा, मी देवेंद्रजींना देखील म्हणालो, सावेंना जरा सांगा. (Atul Save) सावेसाहेब असं तुटक तुटक राहायचं नसतं. सत्ता येत असते, सत्ता जात असते, अशा शब्दांत पवारांनी सावेंना चिमटा काढला.

यावर अतुल सावे यांनी नाही हो साहेब तसे काही नाही, असे म्हणत वेळ मारून नेली. अतुल सावे हे औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना नवखे असून देखील सावे यांना त्यांनी राज्यमंत्री केले होते. २०१९ मध्ये सावेंना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळाले असते पण भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते.

पण अडीच वर्षानंतर झालेल्या सत्तांतरात फडणवीसांना स्वतः उपमुख्यमंत्री व्हावे लागले, पण मंत्रीमंडळात त्यांना आपले विश्वासू असलेले सावे यांना प्रमोशन देत थेट कॅबिनेट मंत्री केले. सहकार सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली. सावे तसे मनमिळावू स्वभावाचे असले तरी ते मितभाषी असल्याचे बोलले जाते. सहसा ते कुठल्या वादातही अडकत नाही.

सहकार खात्याचे मंत्री झाल्यामुळे त्यांचा अजित पवारांशी काही बैठकांच्या निमित्ताने संपर्क आला. पण त्यांच्यात फारसा संवाद झाला नाही. अजित पवारांना असलेला सहकार क्षेत्राचा अनुभव पाहता सावे तसे नवखेच. कदाचित यामुळेच ते पवारांच्या जास्त जवळ जाण्यास टाळत असावेत. पण चाणाक्ष्य अजित पवारांनी तेच हेरले आणि संधी मिळताच सावे यांना याची जाणीव देखील करून दिली. आता तरी सावे अजित पवारांशी जवळीक वाढवतात का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com