NCP Politics : काका-पुतण्यांना एकत्र येण्यापूर्वी 'भाजपला' विचारात घ्यावं लागेल : राष्ट्रवादी विलीनीकरणावर तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं!

Sunil Tatkare Statement : मागील अनेक दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Ajit Pawar-NCP-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 19 Jul : मागील अनेक दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

खरंतर राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. मागील तीन चार वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथा पालथ पाहता कोण कोणासोबत युती आघाडी करेल हे सांगण कठीण झालं आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एक होणार नाहीत, असं सध्यातरी कोणी ठामपणे सांगू शकत नाही.

अशातच एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजघडीला कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाची चर्चा नाही, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे. मात्र, दुसरीकडे विलीनीकरणाच्या निर्णयासंदर्भात भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारात घेतलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Shivsena UBT vs BJP : "आता ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही..."; 'सामना'च्या मुलाखतीनंतर भाजपच्या मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

शिवाय भाजप नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घातल्यास आणि सहमती दिल्यास हे दोन्ही पक्ष एक होणार का? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीने याआधी काँग्रेसबरोबर थेट लढत दिल्याची आठवण सांगितली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करत होते, तेव्हाही राष्ट्रवादीला भाजपबरोबर राहता आलं असतं.

Ajit Pawar-NCP-Sharad Pawar
Mahavikas Aghadi : 'मविआ'ने लोकसभेला कमावलेलं विधानसभेला का गमावलं? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, "तू तू मै मै अन्..."

मात्र आता अधिवेशनात ठराव घेऊन आम्ही एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेतला.1999 च्या विधानसभेमध्ये काँग्रेसबरोबर आम्ही अगदी थेट लढत दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. तसंच यावेळी त्यांनी जनसुरक्षा कायद्याचं समर्थन केलं. ते म्हणाले, आमचा पक्ष सत्तेमध्ये आहे.

कोणताही कायदा जनतेसमोर आणण्याआधी मंत्रिमंडळासमोर येतो, या कायद्याचे विधिमंडळात पूर्ण वाचन झालेले आहे. त्यामुळे पक्ष म्हणून या कायद्याला पाठिंबा आहे. मात्र, या कायद्याला पाठिंबा असला तरी शरद पवारांच्या विचारांना विरोध असणे किंवा त्यांचे विचार नाकारणे, असा अर्थ काढू नका, असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com