बीड रेल्वे लोकार्पण सोहळ्यात काहींनी गोंधळ घातल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले.
पवारांनी थेट सवाल केला – “तुम्ही कधी सुधारणार?”
या घटनेने बीडच्या राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले.
Beed Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांमुळे बीड राज्यभरात बदनाम झाले. जातीयवाद, गुन्हेगारी, खून, महिलांवरील अत्याचाराच्या घटना असे प्रकार सातत्याने समोर आल्यामुळे राजकीय नेते, जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले गेले. अशावेळी अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेऊन सूत्रे हाती घेतली.
विकासाचे राजकारण करायचे, असे म्हणत त्यांनी बीड जिल्ह्याला अनेक नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विमानतळ, कन्वेक्शन सेंटर, रेल्वे अशा विविध गोष्टींसाठी पुढाकार घेत बीडला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी अजित पवार झटत आहेत. हे करत असताना बीड मधील राजकीय वातावरण बदलून चांगले चित्र निर्माण करण्याकडेही त्यांचा ओढा आहे. यातूनच बीड रेल्वे लोकार्पण सोहळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले. तुम्ही कधी सुधारणार? जग कुठे चालले, जरा आत्मचिंतन करा अशा शब्दात त्यांनी भाषणाच्या वेळी नेत्यांसमोर गोंधळ घालणाऱ्यांची खरडपट्टी केली.
तुमचे नेते बोलण्यासाठी उठले की, ह्या हू करता तुम्ही कधी सुधारणार?. बीड मध्ये (Beed News) आज पहिल्यांदा रेल्वे आली आहे. उद्घाटन असल्यामुळे आजच्या दिवस मोफत प्रवास आहे, तो करा पण उद्यापासून तिकीट काढून प्रवास करा. चांगल्या सवयी लावा, अशा कानपिचक्या अजित पवारांनी यावेळी दिल्या. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, वेगवेगळ्या भागात जातो. मात्र तुम्ही आज चेकाळल्यासारखे करत आहात.
तुमचे नेते उठले की ओरडता, गोंधळ घालतात, तुम्ही कधी सुधारणार आहात? मी बोललो की पुन्हा म्हणता की दादा आले आणि आम्हाला बोलले. जग कुठे चालले, दुसरे देश, राज्य कुठे चाललेत याचं जरा आपण आत्मचिंतन करा. आपण कशामुळे वाद घालतोय कशासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करता. आपण सर्व माणूस आहोत, माणुसकी दाखवा असेही अजित पवार म्हणाले.
आम्हाला राज्यातील सर्व जाती धर्मांना न्याय द्यायचा आहे. आम्ही जातीचं नात्याचं राजकारण करण्यासाठी आलेलो नाहीत. समाजाचे भलं करण्यासाठी आलो आहोत. देशाचे पंतप्रधान यांचीही तीच भूमिका आहे आणि ते आमच्या पाठीशी आहेत, असे सांगत अजित पवार यांनी मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षावर अप्रत्यक्षरित्या भाष्य केले.
प्र.1. बीड रेल्वे लोकार्पण सोहळ्यात काय घडले?
कार्यक्रमात काहींनी गोंधळ घातला.
प्र.2. अजित पवारांनी गोंधळखोरांना काय म्हटले?
“तुम्ही कधी सुधारणार?” असा थेट सवाल केला.
प्र.3. या घटनेवर अजित पवारांची भूमिका काय होती?
त्यांनी कठोर भाषेत गोंधळखोरांना फटकारले.
प्र.4. बीड रेल्वे लोकार्पणाचे महत्त्व काय आहे?
हा लोकार्पण सोहळा बीडच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.