Jalgaon politics : पक्ष कसा सांभाळायचा शरद पवारांकडून राऊतांनी शिकावे : गुलाबराव पाटलांचा टोला

Gulabrao Patil, Sanjay Raut News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकमेकाविरूध्द सभा घेणे सुरू आहे.
Gulabrao Patil, Sanjay Raut News
Gulabrao Patil, Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकमेकाविरूध्द सभा घेणे सुरू आहे. तरीही राष्ट्रवादी एकसंघ असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पक्ष कसा सांभाळायचे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडे शिकून बोध घ्यावा असा, टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते आहेत, असे वक्तव्य केले होते, याबाबत पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, नेतेपदाची राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे. कोणकोणाचे नेते आहेत, हे पक्षानेच ठरवायचे आहे.

Gulabrao Patil, Sanjay Raut News
Vinayak Raut News : शरद पवारांकडे पाठ फिरवणारा गट मोदींना दैवत मानतो ; राष्ट्रवादीत फूट की गद्दारी ? ; विनायक राऊतांचा सवाल

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये (NCP) असलेले एकमेक सर्व आपलेच असल्याचे म्हणत आहेत. तर दुसरीकडे त्यांची एकमेकाविरूध्द सभा घेणेही सुरू केले आहे. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्य पाहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व एकजुटीने चालले आहे. तसेच हे सर्व समजुतीने काम झाले आहे. असा शिक्कामोर्तब जनतेमधून होतांना दिसत आहे.

राष्ट्रवादी पक्ष फुटलेला नाही, तर तो एकसंघ आहे, असे चित्र सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण केले जात आहे. पक्षात फुट पडलेली असली तर पक्ष कसा सांभाळायचा हे शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोध घ्यावा, असा सल्ला पाटील यांनी दिला.

Gulabrao Patil, Sanjay Raut News
Karad Congress News : मोदींच्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी युवक काँग्रेसचा आक्रोश मशाल मोर्चा

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पहिला सभा येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात झाली. त्यानंतर बीड आणि कोल्हापुरमध्ये सभा झाली. तर अजित पवार यांची बीडमध्ये रविवारी सभा होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com