VBA News : वंचित आघाडीने संभाजीनगरात एमआयएमला बनवले 'मामू'...

Chhatrapati Sambhajinagar : अकोला आणि अमरावतीमध्ये 'एमआयएम'ने प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याच्या बदल्यात वंचितने संभाजीनगरात उमेदवारच दिला नाही. या भ्रमात असलेल्या एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : वंचित बहुजन आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील Lok Sabha Constituency अधिकृत उमेदवार अफसर खान यांना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला नव्हता, असे सांगितले गेले. दरम्यान, अफसर खान यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र खान यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी आपला अर्ज एबी फॉर्मसह दाखल केल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अकोला आणि अमरावतीमध्ये 'एमआयएम'ने प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar व आनंदराज आंबेडकर Anandraj Ambedkar यांना पाठिंबा दिल्याच्या बदल्यात वंचितने संभाजीनगरात उमेदवारच दिला नाही, या भ्रमात असलेल्या एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झाले. प्रकाश आंबेडकर यांना कुठलाही दगा फटका होऊ नये, याची काळजी घेत एमआयएमच्या AIMIM पाठिंब्यावर मुस्लिम मते आपल्याकडे वळवण्यासाठी वंचितने केलेली ही खेळी असल्याचे आता उघड झाले आहे.

अफसर खान यांनी पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिल्याचे काल सांगितले. तर पूर्वी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याचाच अर्थ वंचितने केवळ एमआयएमचीच नाही तर माध्यमांचीही दिशाभूल केली. एकूणच एमआयएमने न मागता दिलेल्या पाठिंब्याचा वंचित आघाडीने फायदा उचलला.

Prakash Ambedkar
Shivsena News : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादिवशीच संभाजीनगरमध्ये धक्का; शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा 'जय महाराष्ट्र'

2019 च्या निवडणुकीत अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघांत पराभूत व्हावे लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसोबतची युती तोडली होती. 2024 च्या लोकसभाही वंचितने स्वबळावर लढवण्याची घोषणा करत महाराष्ट्रात बहुतांश मतदारसंघात उमेदवार दिले.

एमआयएमने गेल्या निवडणुकीत केलेल्या दगाबाजीचा वंचितने संभाजीनगरात पाठिंबाच्या बदल्यात आमच्या सोबत दगाबाजी केल्याचा आरोप आता एमआयएमकडून केला जात आहे. इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी जाहीरपणे वंचितच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी आम्हाला फसवल्याचा आरोप केला आहे.

यावर वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता, असे म्हणत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. एकूणच वंचित आणि एमआयएममधील दरी या प्रकारामुळे आणखीनच वाढणार असल्याचे दिसते. वंचितचा उमेदवार निवडणुकीत नसता तर त्याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला असता. मात्र, आता या शक्यतेवरही पाणी फिरले आहे.

R

Prakash Ambedkar
Shivsena News : शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ : भाजपत प्रवेश करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com