Ambadas Danve On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच सगळं श्रेय मनोज जरांगे पाटील अन् समाजाचं! आता पुन्हा फसवणूक नको..

Ambadas Danve Reaction On Maratha Reservation : आता फक्त सरकारने प्रमाणपत्र वाटप करण्यात अडचण आणून फसवणूक करू नये ही माफक अपेक्षा.
Ambadas Danve On Maratha Reservation News
Ambadas Danve On Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : 'डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन' अशा शब्दात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय हे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेल्या समाजाचे आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. आता फक्त सरकारने फसवणूक करू नये, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली.

ओबीसीतून मराठा आरक्षण, हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. 29 रोजी सुरू झालेले उपोषण पाचव्या दिवशी यशस्वीरित्या संपले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत या संदर्भात जीआर देखील काढला. या निर्णयानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी या संपूर्ण यशाचे श्रेय केवळ मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे असल्याचे म्हटले आहे.

मराठा समाजाने आरक्षणाची महत्त्वाची लढाई जिंकली! यांचे संपूर्ण श्रेय मनोजदादा जरांगे पाटील यांना तसेच त्यांना साथ देणाऱ्या गोर गरीब जनतेला जाते. एक सामान्य माणूस अख्खा व्यवस्थेला पुरून उरत, व्यवस्थेला झुकवून टाकतो. सरकारचे कट कारस्थान हाणून पाडतो. आता फक्त सरकारने प्रमाणपत्र वाटप करण्यात अडचण आणून फसवणूक करू नये ही माफक अपेक्षा. आणि शेवटचं मराठा आरक्षणाचं सर्व श्रेय हे जरांगे पाटलांच आणि त्यांच्या पाठीमागं राहणाऱ्या समाजाचे असल्याचा पुनरुच्चार दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

Ambadas Danve On Maratha Reservation News
Manoj Jarange Patil Agitation: मराठा आरक्षण आंदोलन; डॉ राधाकृष्ण विखे पाटील ठरले मुख्यमंत्र्यांचे नवे संकट मोचक!

अंबादास दानवे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करावी, अशी मागणीही केली होती. यापुर्वी एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये मराठा समाजाची फसवणूक केली होती. आता पुन्हा सरकारने तोच प्रकार करू नये, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

Ambadas Danve On Maratha Reservation News
Ambadas Danve On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तेव्हा आणि आत्ता! मराठा आरक्षणावर अंबादास दानवेंकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत कोंडी..

महादेव मुंडेंच्या आरोपींचे काय झाले?

दरम्यान, परळीतील महादेव मुंडे यांची हत्याकाडाला जवळपास 23 महिने उलटून गेले. अद्याप आरोपी पकडण्यात काहीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मला भेटून गेले. त्यांनी खरी वस्तुस्थिती आम्हाला सांगितली होती. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत 31 जुलैला एसआयटी स्थापन केली, त्यानंतर काहीच कारवाई नाही ? मुख्यमंत्री मुंडे कुटुंबीयांना न्याय कधी देणार? का सो काॅल्ड स्थानिक बीडमधील गुंड पुढाऱ्यासमोर आपण झुकताय ? असा सवालही दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com