Dr. Radhakrishna Vikhe Patil News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेतले. हे आंदोलन देशभर चर्चेत होते. प्रशासन आणि न्यायालयाच्या भूमिकेमुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. मात्र निर्णायक क्षणी या आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पाच प्रमुख मागण्या मान्य झाल्याने मंगळवारी आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण मागे घेतले. अतिशय गंभीर वळणावर काल मराठा आरक्षण आंदोलन पोहोचले होते. त्यामुळे आंदोलकांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली होती.
विविध संवैधानिक संस्था, पोलीस, ओबीसी आरक्षण समर्थक देखील आक्रमक झाले होते. त्यामुळे आझाद मैदानावर मराठा आंदोलक ईरेला पेटले होते. यामध्ये आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली. आंदोलन मागे घेण्यामध्ये डॉ विखे पाटील यांची भूमिकाच निर्णायक ठरली.
यापूर्वी मराठा आरक्षणासाठी चार वेळा मराठा आंदोलन झाले आहे. यापैकी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांना आंदोलन हाताळण्याची जबाबदारी सोपवली होती. विविध आंदोलनातही महाजन सरकारचा बचाव करण्यात यशस्वी झाल्याने ते मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक ठरले होते.
यंदाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाक आंदोलनात मात्र गिरीश महाजन फारसे माध्यमान पुढे आले नाही. त्यांनी कोणतेही जाहीर विधान करण्याचे देखील टाळले. तर ते या सबंध आंदोलनाच्या कालावधीत मुंबईत ठाण मांडून होते. उप समितीच्या बैठकीला देखील त्यांनी हजेरी लावली होती.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत सात दिवस आधी डॉ विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त करण्यात आली. त्यांनी अतिशय चतुरपणे मनोज जरांगे पाटील दुखावतील अशी विधाने टाळली. त्याचबरोबर अतिउत्साही लक्ष्मण हाके यांनाही दम भरला. एकंदरच वातावरण शांत ठेवण्यासाठी संयमाने स्थिती हाताळली.
डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिंदे समितीची देखील मदत घेतली. हे सर्व घडत असताना आंदोलकांचा रोष मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर दिसून आला.
मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन सोडविताना त्याचे श्रेय विखे पाटील यांना दिले. निमित्ताने डॉ विखे पाटील मराठा आरक्षण आंदोलनात महायुती सरकारचे एक नवे संकट मोचक अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी ठरले. हे सर्व करताना चाणाक्षपणे ते सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात विसरले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.