Raju Shetti On Maratha Reservation: मराठा आरक्षणात काही झारीतील शुक्राचार्यांचा अडसर; शेट्टींचा आरोप...

Marathwada News : आरक्षणासाठी जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे.
Raju Shetty News
Raju Shetty NewsSarkarnama

Jalna Maratha Protest News : मराठा आरक्षण मिळू नये, यासाठी काही झारीतले शुक्राचार्य अडचणी निर्माण करत आहेत. पण केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

Raju Shetty News
Tanaji Sawant Visit Protester : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का ? आंदोलकांचा सावंतांना सवाल...

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील व इतर आंदोलकांची भेट (Raju Shetty) शेट्टी यांनी आज घेतली. या वेळी जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी विनंतीही शेट्टी यांनी केली. (Jalna) अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौदा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

राज्यभरातील सर्व पक्षांचे नेते, आमदार, खासदार, मंत्र्यांनी अंतरवालीत येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. (Marathwada) अजूनही भेटायला येणाऱ्यांची गर्दी कमी झालेली नाही. जरांगे यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा वाढतो आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आज अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.

मराठा समाज हा शेतीवर उदरनिरर्वाह करणारा समाज आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमी हा समाज अडचणीत सापडत आहे. शैक्षणिक व नाेकरीसाठी या समाजाला आरक्षणाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज आरक्षणासाठी झटतो आहे. आता त्यांचा अंत सरकारने पाहू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी खासदार असताना लोकसभेत प्रथम मागणी केली होती.

परंतु काही झारीतील शुक्राचार्य मराठा आरक्षणात अडचणी आणत आहेत. राज्यातील व दिल्लीतील नेते मंडळी यांनी आरक्षण कसे लवकर देता येईल याचा विचार करावा. सोमवारी सायंकाळी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक होत आहे, यामध्ये निर्णय घेऊन आरक्षणाचा जीआर काढावा, अशी मागणीही शेट्टी यांनी या वेळी केली. आरक्षणासाठी जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंतीदेखील शेट्टी यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Raju Shetty News
Pawana Band Jalvahini : महेश लांडगेंच्या लढ्याला यश; पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com