Tanaji Sawant Visit Protester : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का ? आंदोलकांचा सावंतांना सवाल...

Maratha Reservation News : आरक्षण मिळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही सावंत यांनी आंदोलकांना दिली.
Minister Tanaji Sawant News
Minister Tanaji Sawant NewsSarkarnama

Dharashiv News : अंतरवाली सराटी येथे गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाचे पडसाद मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागात उमटत आहेत. मुंडण, वाहन रॅली, उपोषण, रास्ता रोको अशा प्रकारे आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संस्था, संघटना आणि मराठा तरुण रस्त्यांवर उतरत आहेत. (Maratha Reservation) धाराशिव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांची राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी आज भेट घेतली.

Minister Tanaji Sawant News
Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @जालना : साष्टी ते अंतरवाली जरांगे यांच्या आंदोलनाचे `अग्निपथ`.. भाग-५

परंतु मराठा नेत्यांबद्दलही आंदोलकांच्या मनात राग असल्याचे या वेळी दिसून आले. भेटीसाठी आलेल्या सावंत यांना मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा सवाल आंदोलकांनी विचारला आणि गोंधळ उडाला. (Osmanabad) यावर मी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कधीही रस्त्यावर उतरायला तयार आहे, असे म्हणत सावंत (Tanaji Sawant) यांनी तिथून काढता पाय घेतला. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.

उपोषणकर्ते अक्षय नाईकवाडी यांच्याशी सावंत यांनी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाचा ठोस निर्णय न झाल्यास राजीनामा देणार का ? असा थेट सवालच आंदोलकांनी सावंत यांना केला. (Marathwada) यावर आरक्षण मिळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही सावंत यांनी आंदोलकांना दिली.

मात्र, याने समाधान न झाल्यामुळे आंदोलकांनी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणबाजी सुरू केली. या वेळी जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यानी माईक खेचून घेत राजीनाम्याची मागणी करणाऱ्या तरुणाला खडसावले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक अमोल जाधव यास ताब्यात घेतले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com