Sanjay hirsat : आरोप, आयकर विभागीच नोटीस अन् आता व्हायरल व्हिडिओ! टेन्शनमध्येही संजय शिरसाटांकडून बैठका..

controversy and serious allegations, Sanjay Shirsat conducted a tense review meeting. : शिरसाट यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता. परंतु विरोधकांना तो जाणवू नये यासाठी त्यांनी बैठका घेत आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिली.
Sanjay Shirsat In Meeting News
Sanjay Shirsat In Meeting NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अर्धनग्न व्हायरला व्हिडिओमुळे ऐन पावसाळी अधिवेशनात वातावरण तापले आहे. विरोधकांनी चोहोबाजूंनी कोंडी केलेली असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या बचावासाठी कोणीच पुढे येताना दिसत नाहीये. उलट हाॅटेल व्हिट्स प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी लावून मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांना दणकाच दिला. तर प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवून त्यांच्या डोकेदुखीत वाढच केली.

हे कमी की काय? म्हणून विरोधकांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या बेडरूममधील अर्धनग्न अवस्थेतील शेजारी नोटांची भरलेली बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर एकच खळबळ उडाली आणि संजय शिरसाट पुन्हा गोत्यात आले. बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप, हाॅटेल खरेदी प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी, इनकम टॅक्स विभागाची नोटीस आणि आता व्हायरल झालेला व्हिडिओ अशा टेन्शनमध्ये असलेल्या संजय शिरसाट यांनी आज संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

शिरसाट यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता. परंतु विरोधकांना तो जाणवू नये यासाठी त्यांनी बैठका घेत आपल्यावरील आरोप खोटे, बिनबुडाचे असल्याचे सांगत उलट आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावरच मानहानीचा खटला भरण्याची धमकी दिली. (Shivsena) एकापाठोपाठ एक अशी संकट ओढावत असताना एकाकी पडलेले संजय शिरसाट आपली सुटका कशी करून घेणार? हा खरा प्रश्न आहे. पक्षाने वाऱ्यावर सोडले, मित्रपक्ष उघड्या डोळ्याने आपल्या सरकारमधील मंत्र्यावर होणाऱ्या आरोपांवर गप्प आहेत. त्यामुळे शिरसाट यांना हा लढा एकट्यानेच लढावा लागणार हे मात्र निश्चित.

तोच थाट, तीच भाषा..

संजय शिरसाट यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत शहरातील अतिक्रमण कारवाईची माहिती घेत प्रशासनाला काही सूचनाही केल्या. यावेळी त्यांचा तोच थाट अन् तीच भाषा दिसून आली. रस्त्याचे मोजमाप बरोबर होण्यासाठी रस्त्याचे मध्यबिंदू नकाशानुसार घ्या. त्यासाठी नगररचना विभाग आणि भुमिअभिलेख विभागाने संयुक्त मोजणी करावी. परवानगी असलेली बांधकामे जर रस्त्याच्या हद्दीत येत असतील तर संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्या. जेथे आवश्यक आहे तेथे गुंठेवारी करुन बांधकामे नियमानुकूल करा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

या मोहिमेत जे लोक बाधीत होत आहेत त्यांना म्हाडा मार्फत घरे देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय अन्यत्रही वसाहती म्हाडा मार्फत उभारून घरे देण्याची प्रक्रिया राबवावी. या मोहिमेसाठी सर्व धर्मियांचे सहकार्य लाभत असून त्याद्वारे हे शहर सुंदर बनविण्याचा सगळ्यांचा मानस असल्याचे शिरसाट म्हणाले. याच मोहिमेत आता जे रस्ते महामार्ग प्राधिकरणात येतात त्यांचा विकास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे,असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com