High Court News : महागाई, बेरोजगारी विरोधात जनजागरणासाठी ध्वनिक्षेपकाला परवानगी द्या..

Marathwada News : रहदारीस अडथळा होवुन अपघात झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो असे कारण देत परवानगी नाकारली आहे.
Aurangabad High Court News
Aurangabad High Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad News : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून तीन चाकी रिक्षावर लाऊडस्पिकर लावून महागाई, बेरोजगारीच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे परवानगी मागीतली होती. (High Court News) ही परवानगी नाकारल्याच्या विरोधोत दाखल याचिकेत भाकपने नव्याने अर्ज करावा आणि त्याच्यावर एका आठवड्यात निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट, न्या. संजय देशमुख यांनी दिले आहेत.

Aurangabad High Court News
Mla Rajput On Bhumre News : इतका सूडबुद्धीने वागणारा पालकमंत्री कधी बघितला नाही..

भाकपतर्फे देशव्यापी जनजागृतीचा भाग म्हणून ८ ते ३१ जून दरम्यान शहरात लाऊडस्पिकर लावून महागाई, बेरोजगारीच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी नियमाप्रमाणे अटी व शर्तीसह परवानगी देण्याची विनंती पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली होती. (Aurangabad) अर्जासोबत वाहनाचे वैध कागदपत्र, मालकी प्रमाणपत्र, विमा, पीयुसी, वाहन परवाना आदी बाबी सादर केल्या होत्या. (Marathwada) असे असतानाही परवानगी देण्यात आली नाही.

म्हणून भाकपतर्फे पोलिस महासंचालकांकडेही परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे याचिकाकर्ते भाकपचे शहरसचिव ॲड. अभय टाकसाळ यांनी ॲड महेश मुठाळ यांच्यामार्फत खंडपीठात (High Court) याचिका दाखल केली. पोलिस आयुक्तालयातर्फे विशेष शाखेच्या पोलिस निरिक्षकांनी परवानगी नाकारताना शहरात वाहतुकीच्या खूप समस्या असून, रहदारीस अडथळा होवुन अपघात झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो असे कारण देत परवानगी नाकारली आहे.

मात्र दरम्यानच्या काळात पोलिस आयुक्तालयांतर्फे तब्बल शंभरावर विविध पक्ष संघटना, जाहिरात एजन्सीज आदींना परवानगी दिल्याचे ॲड. मुठाळ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीनंतर पोलिसांनी दिलेले कारण जाणिवपूर्वक दिसत नाही.

याचिकाकर्त्याने विविध सामाजिक संस्थांना आणि अगदी राजकीय पक्षांनाही परवानगी दिल्याचे रेकॉर्डवर ठेवले आहे, त्यामुळे अर्जदारांनी नव्याने अर्ज करावा आणि पोलिस आयुक्तांनी एका आठवड्यात निर्णय घ्यावा, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. याचिकाकर्ते ॲड. अभय टाकसाळ यांच्यातर्फे ॲड महेश एल मुठाळ यांनी काम पाहिले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com