Mla Rajput On Bhumre News : इतका सूडबुद्धीने वागणारा पालकमंत्री कधी बघितला नाही..

Shivsena UBT News : फक्त टक्केवारी आणि मनमानी कारभार करत पालकमंत्री भुमरे यांनी माझ्यावर सूड उगवला आहे.
Mla Rajput On Bhumre News : इतका सूडबुद्धीने वागणारा पालकमंत्री कधी बघितला नाही..
Published on
Updated on

Aurangabad Political News : उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटासोबत गेलो नाही, याची दुश्मनी पालकमंत्री संदीपान भुमरे काढत आहेत. गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघात एक छदमाही निधी न देता केवळ मनमानी कारभार सुरू आहे. (Mla Rajput On Bhumre News) इतका सूडबुद्धीने वागणारा पालकमंत्री कधी बघितला नाही, अशी टीका कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला.

Mla Rajput On Bhumre News : इतका सूडबुद्धीने वागणारा पालकमंत्री कधी बघितला नाही..
Ambadas Danve- Bhumre News : पालकमंत्री आहात, जहागीरदार समजू नका ; दानवेंनी भुमरेंना ठणकावले..

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांविरुद्ध ठाकरे गटाचे अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajpurt) यांच्यात मोठी खडाजंगी झाली. जिल्ह्यात निधीचे असमान वाटप करण्यात येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी बैठकीत केला. (Kannad) तालुकानिहाय निधी वाटपाची आकडेवारी द्या, अशी मागणी करताच भुमरे भडकले आणि दानवेंशी त्यांचा वाद झाला.

अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील भुमरेंचीच री ओढली. तत्पुर्वी कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी आपल्या मतदारसंघातील रखडलेली कामे, नको त्या गावात रस्ते देऊन माझ्या कामांच्या यादीला केराची टोपली दाखवल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. (Shivsena) पण मी पालकमंत्री आहे, मला अधिकार आहे म्हणत, भुमरे यांनी राजपूत यांचा आरोप फेटाळला. त्यामुळे संतप्त झालेल्या राजपूत यांनी सभागृहात कामांची यादी व इतर कागदपत्रे भिरकावत संताप व्यक्त केला.

`सरकारनामा`, प्रतिनिधीने त्यांचीशी संपर्क साधला असता राजपूत म्हणाले, गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघात १० टक्के निधी देखील या पालकमंत्र्यांनी दिला नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते ज्या गावात आवश्य आहेत, तिथे न देता मागणी नाही त्या गावात टाकले. मतदारसंघातील एक गाव असे आहे, ज्या गावात स्वातंत्र्यापासून आजतागायत रस्ता नाही. दोन कोटींचा निधी दिला असता तर या गावात रस्ता झाला असता. पण फक्त टक्केवारी आणि मनमानी कारभार करत पालकमंत्री भुमरे यांनी माझ्यावर सूड उगवला आहे.

मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलो, शिंदे गटाच्या खोक्यांना बळी पडलो नाही, म्हणून माझ्याशी असलेली दुश्मनी माझ्या मतदारसंघात निधी न देऊन काढली जात आहे. वर्षभरापासून मतदारसंघातील विकासकामे ठप्प आहेत. माझ्या कामांच्या यादीला हात न लावता पालकमंत्री स्वतःच्या मर्जीने नको तिथे रस्ते व निधी देत सुटले आहेत, असा आरोप देखील राजपूत यांनी केला. मला लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवायचे आहेत, पण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निधी अडवून माझी कोंडी करण्याचा प्रयत्न भुमरे करत आहेत, असेही ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com