Dharashiv: मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सभांना मोठा प्रतिसाद देखील मिळतो आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित राहिलेल्या आणि आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणाने 'मराठा आरक्षणासाठी'साठी अशी चिठ्ठी लिहून शुक्रवारी (ता.२२) आपल्या शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
अमरनाथ भाऊसाहेब कदम (वय २४, गिरवली, ता.भूम, जि.धारशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमरनाथ हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने अंजनसोंडा शिवारातील गट नंबर ५१ मधील स्वतः च्या शेतातील बांधावर आलेल्या लिंबाचा झाडाला भगव्या उपरन्याने गळफास घेत आत्महत्या केली. अमरनाथच्या पश्चयात आई-वडील असा परिवार आहे. तो एकुलता एक मुलगा असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करुन वाशी पोलिस ठाणे येथे घटनेची नोंद केली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अच्युत कुटे करीत आहेत.दरम्यान, हे सरकार आणखी किती लोकांचे बळी घेणार ? मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार ? अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अमरनाथ हा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित राहिला होता.मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यात तो सहभागी होत होता. आंदोनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील साखळी उपोषणमध्ये त्याने सहभाग घेतला होता.
(Editeb By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.