Jalna : शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे व भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांच्यात झालेला वाद ताजा असतांनाच आज पुन्हा या दोघांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. अंबड बाजार समितीसाठी सकाळी मतदानाला सुरूवात झाली. मतदान शांततेत सुरू असतांना एका मतदाराला आमदार कुचे यांच्या समर्थकांनी हटकले.
हा प्रकार पाहून माजी आमदार संतोष सांबरे, आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी धाव घेत मतदाराला रोखणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला जाब विचारला. (jalna) यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या समर्थकांमध्ये बरीच वादावादी आणि त्यातून बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गर्दीला मतदान केंद्राच्या बाहेर काढले. पण या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पहायला मिळाली.
त्यामुळे अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपामध्ये जोरदार लढत आहे. कालच ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी एका हॉटेलवर भाजप आमदार नारायण कुचे यांना अडवत त्यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर सकाळपासून तळ ठोकून आहेत.
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकी राजेश टोपे, नारायण कुचे व ठाकरे गटाचे माजी आमदार सांबरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट युती अशी येथे लढत होत आहे. भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर माजी आमदार भांबरे, कुचे यांच्यातील धुसफूस अजूनही सुरूच असल्याचे आजच्या बाचाबाचीवरून दिसून आले. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.