Nanded APMC Result News : अशोक चव्हाणांनी नांदेड बाजार समितीही राखली, भाजप-युतीला भोपळा..

Ashok Chavan : १८ पैकी सर्वाधिक १२ जागा या काॅंग्रेसने जिंकल्या, तर राष्ट्रवादी ३, ठाकरे गट २ व १ जागा अपक्षाला मिळाली.
Nanded Market Committee News
Nanded Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : भोकर मतदारसंघातील बाजार समितीवर (Nanded APMC Result News) बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची नांदेड बाजार समिती देखील राखली. महाविकास आघाडीने येथे सर्वच्या सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिंदे गटाच्या युतीला इथे भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे गल्ली ते दिल्ली नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांचाच आवाज चालतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Nanded Market Committee News
Patoda Bazar Samiti : पाटोदा-शिरुर बाजार समितीच्या मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते-पोलीस भिडले

नांदेड बाजार समितीमध्ये अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) महाविकास आघाडीची मोट बांधत राष्ट्रवादी, ठाकरे गटाला देखील सोबत घेतले होते. ज्याची जितकी शक्ती, तितके त्याला प्रतिनिधित्व या धोरणानूसार जागा वाटप केले. (Mahavikas Aghadi) एवढेच नाही तर रणनिता आखून काॅंग्रेससह राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या जागा देखील निवडून आणल्या. चव्हाणांच्या या खेळीमुळे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार चिखलीकरांना मात्र धक्का बसला आहे.

भोकर या आपल्या मतदारसंघातील बाजार समितीनंतर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. (Pratap Patil Chikhalikar) यावेळी चव्हाणांनी उमेदवारी देतांना नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्या संचालक व इतर पदाधिकाऱ्यांना थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात काॅंग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. काहींनी चव्हाणांचा आदेश शिरसावंद्य मानला, तर काहीनी वेगळी वाट धरली.

मात्र या सर्वावर मात करत अशोक चव्हाणांनी नांदेड बाजार समितीवरची सत्ता कायम राखली. १८ पैकी सर्वाधिक १२ जागा या काॅंग्रेसने जिंकल्या, तर राष्ट्रवादी ३, ठाकरे गट २ व १ जागा अपक्षाला मिळाली. एकमेव अपक्ष संचालकाने देखील आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला आहे. त्यामुळे चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने भाजप-शिंदे युतीला क्लीन स्वीप दिला आहे.

भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ झाला असून त्यांना खातेही उघडता आले नाही. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण अशोक चव्हाणांमुळे ती धुळीस मिळाली. नांदेड-भोकरसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यावर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com