Ambadas Danve News : थेट मोदींना विरोध करत अंबादास दानवेंनी लक्ष वेधले..

Ambadas Danve attracted attention by protesting directly against Prime Minister Modi : अंबादास दानवे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध दर्शवण्याची रणनिती आखली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यापर्यंत आंदोलक पोहचू शकले नसले तरी हे आंदोलन राज्यात आणि देशभरात पोहचले.
Shivsena Leader Ambadas Danve Protest
Shivsena Leader Ambadas Danve ProtestSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विभागीय नेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आक्रमक पद्धतीने कामाला सुरवात केली आहे. बदलापूर येथील अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधत ताकद दाखवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा पाहता थेट विमानतळाबाहेर जाऊन त्यांना विरोध करण्याचे ठरवत दानवे यांनी संपुर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले.

बदलापूर येथील घटनेविरोधात निदर्शने केल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काल तातडीने महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमानाच्या वेळी चिकलठाणा विमानतळाबाहेर निदर्शने करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानूसार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे घालून, हातात बदलापूर घटनेचा निषेध करत जाब विचारणारे बॅनर घेऊन विमानतळाच्या दिशेने आगेकूच केली.

पण पोलिसांनी आंदोलकांना अलिकडेच रोखत ताब्यात घेतले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळळासाहेब ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये येण्याच्या काही तास अगोदर महाविकास आघाडीचे हे आंदोलन झाले. जळगाव येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणार होते. या दौऱ्याची माहिती असल्याने अंबादास दानवे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध दर्शवण्याची रणनिती आखली होती.

Shivsena Leader Ambadas Danve Protest
Shivsena UBT News : आदित्य ठाकरेंचा संभाजीनगर दौरा, शिवसैनिकांना उर्जा देणार का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ताफ्यापर्यंत आंदोलक पोहचू शकले नसले तरी हे आंदोलन राज्यात आणि देशभरात पोहचले. बदालपूरसह राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरुन संतापाचे वातावरण आहे. अशावेळी पंतप्रधानांसमोरच रोष व्यक्त करण्याची संधी अंबादास दानवे यांनी हेरली. विभागीय नेते पद आणि पाच जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिलेच लक्षवेधी आंदोलन करत अंबादास दानवे यांनी वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेतले.

आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान पोलिसांची सुरू असलेली सक्ती बदलापूरच्या घटनेत तातडीने गुन्हा दाखल करताना दाखवायला हवी होती. आमच्यावर सक्ती करण्यासाठी आम्ही काय अतिरेकी आहोत का ? असा संतप्त सवाल करत अंबादास दानवे यांनी पोलिसांवर सक्ती केल्याचा आरोप केला. एकूणच महाविकास आघाडीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आंदोलनाने भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com