Ambadas Danve On Water Issue : हो, पाणी प्रश्नाला सुरवातीला आम्ही जबाबदार, पण आता भाजपा!

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve makes a confusing statement admitting initial responsibility for Sambhajinagar’s water issue, but now blames BJP and Shiv Sena. :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहराच्या पाणी प्रश्‍नावरून 'लबाडांनो पाणी द्या'हे जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Ambadas Danve On Water Issue News
Ambadas Danve On Water Issue NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : पाच वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. अडीच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. आम्ही महापालिकेत जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा शहरात दोन दिवसाआड पाणी देत होतो, आता 10-15 दिवसाआड पाणी मिळत आहे. त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे (Shivsena) शहराच्या पाणी प्रश्‍नावरून 'लबाडांनो पाणी द्या'हे जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तत्कालीन विरोधीपक्षनेते व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात येऊन आक्रोश मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी सहा महिन्यात पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण त्यापूर्वी आम्ही सत्तेत असताना दोन दिवसाआड पाणी देत होतो.

आम्हीही शहराच्या पाणीटंचाईला जबाबदार आहोत, पण शिवसेनेने काही केले नाही, म्हणून भाजपने काही करू नये, असे नाही. शहरातील काही भागाला जास्त काही भागाला कमी पाणी मिळते या केवळ अफवा असल्याचे दानवे (Ambadas Danve) यांनी नमूद केले. दहा-वीस मिनिट कमी जास्त होत असेल, असा दावा दानवे यांनी केला.'लबाडांनो पाणी द्या' जन आंदोलनाचा समारोप 16 मे रोजी केला जाणार आहे.

Ambadas Danve On Water Issue News
Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुम्ही गावाला पाणी देऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजीनगरचा विषय तुमच्या आवाक्याबाहेर! दानवेंनी खासदार भुमरेंना फटकारले

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पैठण गेट येथून सायंकाळी चार वाजता मोर्चा काढला जाणार आहे. त्यापूर्वी 13 ते 15 मे पर्यंत तीन दिवसात सर्व उपजिल्हाप्रमुख शहरात 560 बैठका घेतली. शुक्रवारपासून चार दिवस हल्लाबोल आंदोलन केले जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. दरम्यान, भाजपाचे नेते मात्र शिवसेनेच्या या आंदोलनावर राजकारण केले जात असल्याचे सांगत टीका करत आहेत.

Ambadas Danve On Water Issue News
Bhagwat Karad On Water Issue : हो.. महापालिकेच्या सत्तेत आम्हीही, पण रिमोट कंट्रोल खैरेंचा म्हणून पाणी प्रश्नाला तेच जबाबदार!

अंबादास दानवे यांनी सुरवातीला आम्ही पाणी टंचाईला जबाबदार असल्याची कबुली दिली असली तरी भाजपाने मात्र शिवेसना उबाठा गट आणि त्यांचे नेते चंद्रकांत खैरे हेच पाणी प्रश्नाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. खासदार डाॅ. भागवत कराड यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या व्हिजन नसलेल्या नेत्यामुळे वीस वर्षात शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, समांतर जलवाहिनी घालवण्याला तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com