Shivsena UBT : अंबादास दानवेंनी महिन्याभरापूर्वी टाकलेला डाव भाजपला आता लक्षात येतोय... सावे-कराड जोडी 'मामू' बनणार?

Sambhajinagar Mayor Election : महापौरपदासाठी एसटी आरक्षण निघाल्यास भाजप अडचणीत येऊ शकतो. अंबादास दानवेंच्या रणनीतीमुळे बहुमत असूनही भाजपला महापौरपद गमवावे लागू शकते.
Shiv Sena UBT leader Ambadas Danve during political discussions ahead of Chhatrapati Sambhajinagar mayoral reservation draw, amid BJP majority and ST category uncertainty.
Shiv Sena UBT leader Ambadas Danve during political discussions ahead of Chhatrapati Sambhajinagar mayoral reservation draw, amid BJP majority and ST category uncertainty.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Mayor : माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी गत महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. अंबादास दानवे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून मामूंना थेट मातोश्री बंगल्यावर नेऊन त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला होता. या प्रवेशानंतर ठाकरे, दानवेंवर टोकाची टीका झाली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता 'मामूंचा' झाला, अशी टीका भाजपमधील नेत्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळ्यांनीच केली. पण अंबादास दानवे यांचा हाच गेम महापौर पदाच्या आरक्षणात गेमचेंजर ठरू शकतो.

महापौर पद जर एसटीला सुटले तर भाजपकडे बहुमत असूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांना 'मामू' बनवू शकतो. सध्या फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम पक्षाकडेच एसटीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे 1997-98 मध्ये रशीद मामू यांच्या बाबतीत जे घडले त्याचीच पुनरावृत्ती 20 वर्षांनी होते की काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असे झाले तर महापौर पदावर अनपेक्षितपणे मामूंची लाॅटरी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळविले. तब्बल 57 नगरसेवक निवडून आल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे निश्‍चित आहे. पण, महापौराच्‍या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठीचे आरक्षण निघाल्यास भाजपकडे महापौरपदासाठी उमेदवारच नाही. 115 पैकी 2 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत्या. एसटी पुरुष प्रवर्गातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मामू आणि एसटी महिला प्रवर्गातून एमआयएमकडून विजयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा असूनही महापौरपदापासून त्यांना दूर राहावे लागू शकते.

Shiv Sena UBT leader Ambadas Danve during political discussions ahead of Chhatrapati Sambhajinagar mayoral reservation draw, amid BJP majority and ST category uncertainty.
Beed Eknath Shinde Shiv Sena entry : म्हणे मुंडेंच्या खास, पण शिंदेंकडे वळल्या! बीड 'झेडपी'साठी मोठा राजकीय डाव

भाजपचे 57 नगरसेवक निवडून आलेले आहेत. पण, महापौरपदासाठीची आरक्षण सोडत निघालेली नसल्याने महापौर कोण होणार? याविषयी उत्सुकता आहे. दरम्यान, शासनाने 22 जानेवारीला आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची यावेळी झालेली निवडणूक ही प्रभाग पद्धतीने पहिल्याच झाली. त्यानुसार नगरसेवकांचे आरक्षण काढताना नव्याने रोटेशन गृहीत धरण्यात आले. त्यामुळे महापौरपदासाठीदेखील हीच पद्धत वापरली जाईल, असे मानले जात आहे.

Shiv Sena UBT leader Ambadas Danve during political discussions ahead of Chhatrapati Sambhajinagar mayoral reservation draw, amid BJP majority and ST category uncertainty.
Chandrkant Khaire Vs Ambadas Danve: अंबादास दानवेला अक्कल आहे का? 2 दिवस थांबा, त्याचं सगळंच बाहेर काढतो : चंद्रकांत खैरेंचा कडक इशारा

रशीद मामू लक्की ठरणार का?

रशीद मामू 7 मे 1997 ते 20 एप्रिल 1998 असे वर्षभर महापौर होते. त्यावेळी शिवसेना-भाजपकडे बहुमत होते. पण, त्यांकडे एसटीचा नगरसेवक नव्हता. त्यामुळे रशीद मामू अपक्ष असूनही, त्यांना महापौरपदासाठी संधी देण्यात आली. त्यावेळी हा विषय न्यायालयात गेला होता. एसटी प्रवर्गासाठी महापौरपद सुटले तर 1997 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com