Ambadas Danve : गॅस, नैसर्गिक वायुचा पुरवठा विस्कळीत, विश्वगुरू लवकरच 'गावाकडे चला' म्हणत चुली पेटवायला लावणार; अंबादास दानवेंचा मोदींवर निशाणा

Ambadas Danve on Modi : अंबादास दानवे यांनी जागतिक संघर्षामुळे भारतातील गॅस व इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. रुपया घसरणीवरूनही त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : अमेरिका-इस्त्राईलने इराण विरोधात युद्ध पुकारले आहे. जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अमेरिका, इस्त्राईलच्या हल्ल्यात गॅस, पट्रोल-डिझेलचे प्रकल्प बाधित झाले आहेत. या युद्धाचा परिणाम भारत देशावरही होणार आहे. देशातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या भूमिकेवरून टीका करत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत देशात​ गॅस, नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत होत चालला आहे, कंपन्यांनी हात टेकलेले स्पष्ट दिसतायेत. पण काळजी नको, 'विश्वगुरु' लवकरच 'गावाकडे चला' असा क्रांतिकारी नारा देऊन आपल्याला पुन्हा चुली पेटवायला लावणार असे दिसतंय, अशा शब्दात टीका केली आहे.

​सध्या काही 'भक्त' गॅस पाइपलाईन सोडून नाल्या-नाल्यांत पाइप टाकून गॅस शोधण्याच्या मोहिमेवर निघणार आहेत म्हणे, असा चिमटाही त्यांनी पंतप्रधानांना काढला. दोन दिवसापुर्वीच शहरात पेट्रोल टंचाईच्या भितीने पंपावर रांगा लागल्या होत्या. आता तीच परिस्थिती येणाऱ्या काही दिवसात गॅससाठी लागण्याची शक्यता वर्तवत अंबादास दानवे यांनी केंद्रातील सरकारच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve targets Prime Minister Narendra Modi over gas supply concerns and rising fuel crisis amid global geopolitical tensions.
Chhatrapati Sambhajinagar: अतिक्रमण हटाव मोहिमेत खोडा घालणाऱ्या एमआयएमच्या 11 नगरसेवकांना दणका, गुन्हे दाखल

रूपया गडगडला..

रुपयाची ही प्रगती बघून वाटतंय की लवकरच 'रुपया 92 पार' चं सेलिब्रेशन करायला एखादा इव्हेंट ठेवला जाईल! ​जगात डंका वाजत होता, आता रुपयाचा 'बँड' वाजलाय. विश्वगुरुंच्या राज्यात रुपया व्हेंटिलेटरवर आणि 'भक्त' अजूनही मास्टरस्ट्रोकच्या शोधात, असल्याचे म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com