Ambadas Danve News : अंबादास दानवेंनी तत्परता दाखवली अन् दोन तरुणांचे जीव वाचले!

Ambadas Danve rushed to help accident victims. Due to timely treatment, both young farmers are safe. : ही दोन्हीही शेतकरी मुले कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील असून सुहास कांबळे व पवन पठारे ही त्यांची नावे आहेत.
Ambadas Danve Help On Road Accident News
Ambadas Danve Help On Road Accident NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivena UBT : अपघातग्रस्तांना मदत करणे, त्यांना आपल्या वाहनातून वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले अशा अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. राजकीय नेत्यांची समयसूचकताही अशा घटनांमधून अनेकदा दिसून आली आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी दौऱ्या प्रसंगी रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना वेळीच मदत करत जीवनदान दिल्याचे उदाहरणं आहेत.

असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावरील इसारवाडी फाटा येथे नुकताच घडला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोटारीने पुणे दौऱ्यासाठी निघाले होते. त्याचवेळी इसारवाडी फाटा येथे ट्रक-टेम्पोचा भीषण अपघात झालेला त्यांनी पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अंबादास दानवे यांनी आपला ताफा रस्त्याच्या कडेला थांबवला आणि तातडीने मदतीसाठी धावले.

अपघातात वाहनाखाली अडकलेल्या दोन शेतकरी मुलांना गाडीच्या बाहेर काढण्यासाठी स्वतः दानवे, त्यांच्यासोबतचे सहकारी आणि रस्त्यावरील नागरीक पुढे सरसावले. (Shivsena) या दोन तरुणांना वाहनाखालून बाहेर काढल्यानंतर तातडीने अत्यावश्यक सेवांसाठी दानवे यांनी स्वतः संपर्क साधून रुग्णवाहिका व बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवून घेतले. या तत्परतेमुळे भीषण अपघातात गाडीखाली दबलेल्या या दोन तरुण शेतकरी मुलांना एका तासाच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले.

Ambadas Danve Help On Road Accident News
Ambadas Danve Letter To Fadnavis : गुजराती कंपन्यांसाठी पायघड्या; छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कचरा कंत्राट घोटाळा!

सर्वांच्या अथक परिश्रमानंतर या तरुणांना बाहेर काढण्यात आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार ही दोन्हीही शेतकरी मुले कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील असून सुहास कांबळे व पवन पठारे ही त्यांची नावे आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारणावर विश्वास असणाऱ्या शिवसैनिकांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त शेतकरी मुलांचे प्राण वाचवल्याची भावना अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

Ambadas Danve Help On Road Accident News
Shivsena UBT News: उद्धव ठाकरे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला झुंजवणार, 'असे' आहे प्लॅनिंग!

अपघात भीषण होता, या तरुणांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाच्या संकटात धावून जाणे हे आमचे कर्तव्यच आहे. मी पुण्याला निघालो आणि रस्त्यात अपघाताचे हे भीषण दृश्य पाहून मी गाडी थांबवली. अपघात झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळाले नाहीत, म्हणून अनेक जण दगावल्याचे आपण पाहतो. पण हे टाळायचे असेल तर अपघातग्रस्तांना तातडीने मदत होणे गरजेचे असते. शिवसेनाप्रमुखांच्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारणावर आम्ही चालतो. त्यानूसार त्या तरुणांना वेळीच उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केला, ते आता सुखरूप आहेत, याचे समाधान वाटत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com