Ambadas Danve News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कुपोषण, फुशारक्या कसल्या मारता ?

Shivsena News : विश्वगुरू म्हणून मिरवणारा भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve Newssarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : गेल्या 48 तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त 6 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहे. (Ambadas Danve News) पण वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुंबईतील शिवालयमधील पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले

Ambadas Danve News
#Short : शिंदेंच्या रणरागिणीने ठाकरेंना सुनावलं | Jyoti Waghmare On Uddhav Thackeray | Shivsena

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे ठाण्यात रुग्ण सापडले असून वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता सरकारने यावर प्रतिबंधात्मक कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. (Shivsena) अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप (Affected Farmers) शेतकऱ्यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत.

मुख्यमंत्री (Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचा दर उंचावला आहे. शासन आपल्या दारी की कंत्राटदार, उद्योगदारांच्या दारी, असा टोलाही दानवे यांनी यावेळी सरकारला लगावला. शेतकरी आत्महत्या, कुपोषण रोखण्यात हे सरकार अपयशी ठरली आहे. उद्योग विभागाने आज विविध वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरांतीवर प्रतिक्रिया देताना, एखाद्या कंपनीसोबत करार केला म्हणजे गुंतवणूक झाली असे नाही, असे दानवे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विश्वगुरु म्हणून मिरवणारा भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यात स्पशेल अपयशी ठरला आहे, म्हणून सध्या ते राम मंदिराच्या मुद्द्यावर भावनिक फुंकर घालून राजकारण करत आहेत. तर 'इंडिया' आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणूका लढणार असल्याचे दानवे म्हणाले. शिंदे गटातील अनेक खासदार हे भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत. त्या उमेदवारांना भाजप गिळून टाकणार असल्याचा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला.

नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठ्या घोषणा केल्या होत्या. हे सरकार फक्त घोषणा करते अंमलबजावणी नाही, अशी टीका दानवे यांनी केली होती. त्यानंतर यवतमाळमध्ये सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे विरोधकांनी पुन्हा सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारमधले मंत्री सभागृहात देतात. प्रत्यक्षात सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Ambadas Danve News
Ambadas Danve News : हिवाळी अधिवेशनातील कामगिरीचे दानवेंकडून 'प्रगती पुस्तक' सादर..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com