Ambadas Danve News : हिवाळी अधिवेशनातील कामगिरीचे दानवेंकडून 'प्रगती पुस्तक' सादर..

Shivsena News : मद्य विक्रीला प्रोत्साहन देणे ही आपली संस्कृती नाही, मात्र राज्यातील महायुतीच्या सरकारने उच्छाद मांडला आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : नागपूरचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या संपुर्ण अधिवेशन काळात विरोधी पक्ष म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेतील अंबादास दानवे यांच्या कामाची तुलना होत आहे. (Ambadas Danve News) वड्डेटीवार यांच्या तुलनेत अंबादास दानवे यांची कामगिरी सरस ठरली, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Ambadas Danve News
Marathwada Politics News : भाजप शहराध्यक्षाच्या मुलीच्या लग्नात नेत्यांचे `हम साथ साथ है`...

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) उपस्थीत केलेल्या मुद्यांची माहिती देणारे `प्रगती पुस्तकच` पत्रकार परिषद घेऊन सादर केले. (Shivsena) नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दारूची दुकाने आणि बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी दिलेली परवानगी म्हणजे संस्कृती बिघडविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात दानवे यांनी सुरुवातीलाच केला.

मद्य विक्रीला प्रोत्साहन देणे ही आपली संस्कृती नाही, मात्र राज्यातील महायुतीच्या सरकारने उच्छाद मांडला आहे. (Marathwada) आता रस्त्यावर दारू विक्रीला परवानगी देणेच शिल्लक आहे, असा टोला दानवे यांनी सरकारला लगावला. बॅंक घोटाळ्यात सुनील केदार यांना राजीनामा मागण्याचा भाजपला अधिकार नाही, भाजपने ईडी चौकशी लावलेले आमदार आज सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे भाजपने नाकाने कांदे सोलू नयेत. मराठा आरक्षण, अवकाळी नुकसान भरपाई, कांदाप्रश्‍न, भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य, मराठवाड्यातील पाणीप्रश्‍न, वॉटरग्रीड, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह विविध प्रश्‍नांवर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविल्याचे दानवे म्हणाले. राज्यातील ८८ तालुके आवर्षणग्रस्त असताना राज्य शासनाने केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर केंद्र शासनाची जबाबदारी वाढते. केंद्राने राज्य सरकारवर डोळे वटारू नये, म्हणून कमी तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी 13 हजार कोटींची घोषणा केली, मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनात यातील केवळ 40 कोटींच्या प्रस्तावासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Ambadas Danve News
Ambadas Danve News : लोकसभेची उमेदवारी दानवेंना की खैरेंना, दानवे म्हणतात...

तृतीयपंथीयांना समाजाकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यांना घरही भाड्याने देण्यास लोक टाळतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्‍न लावून धरला. त्यांच्यासाठी आता स्वतंत्र मंडळ तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्‍नावरही आपण आवाज उठवल्याचे दानवे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Ambadas Danve News
Ambadas Danve : ...मग फडणवीस, गडकरी यांनी विदर्भासाठी काय केले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com