Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले असले तरी ठाकरे गटाला सेटबॅक बसल्याचे दिसून आले. यात हक्काची असलेली छत्रपती संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे.
येथे शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आमनेसामने असल्याने प्रतिष्ठेची लढाई झाली. त्यात भुमेरेंनी खैरेंना पराभवाची धूळ चारत शिंदेंचे नाक राखले. यानंतर खैरेंनी आपल्या पराभवाचे खापर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडल्याने ठाकरे गटातच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
अंबादास दानवे Ambadas Danve यांनी लोकसभा निवडणुकीत काम केले नसल्याचा आरोप चद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदा ते दोन्ही नेते शिवसेना आढावा बैठकीत एकत्र आले. त्यावेळी अंबादास दानवे यांनी खैरे यांच्यासमोरच निवडणुकीमध्ये पराभवाचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडणूक जिंकायची असेल तर उमेदवाराला आपला करिष्मा दाखवावा लागतो. दानवे असे म्हणताच खैरेंच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते.
लोकसभेत पराभव झाला असला तरी आता आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. आपला हा मोठा पराभव झालेला आहे. मात्र यातून पुन्हा पक्षासाठी मोठी भरारी घ्यावी लागेल. जे झाले ते सोडून आगामी काळात कुठे कमी राहिलो, ज्या ठिकाणी कमतरता राहिल्या, त्यावर लक्ष द्यावे लागले. आपण सर्कल वाईस गेलो का, असाही दानवेंनी प्रश्न उपस्थित केला.
या निवडणुकीत पक्षाला मानतात तेवढ्याच लोकांचे मतदान आपल्याला झाले. त्यामुळे निवडणुकीत उमेदवाराला स्वतःचा करीष्मा वापरावा लागतो. तो आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत दाखवावा लागेल. त्यामुळे आपले प्रत्येक मतदारसंघात 50 हजाराहून अधिक मतदान वाढतील, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. दानवे एकीकडे बोलत असताना दुसरीकडे चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगून जात होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.