

Shivsena UBT News : शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सरकार अक्षरशः झुंडशाही करत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध होताना दिसतो आहे. परभणीत याच महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठ्या चालवल्या. यावर आता विरोधकही सरकारवर तुटून पडले आहेत.
अंबादास दानवे यांनी राज्यात निजामशाही सुरू आहे का? असा सवाल करत सरकारवर टीका केली आहे. परभणीत जे घडलं ते लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. केवळ 50 शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढण्यासाठी 500 पोलिसांचा फौजफाटा? ही तर सरळ सरळ दडपशाही आहे! या 'निजामशाही' कारभाराचे भयानक स्वरूप आज पहायला मिळाले.
महिला आंदोलकांचे भररस्त्यात मंगळसूत्र हिसकावले गेले. पोलीस बुट घालून मंदिरात घुसले. श्रद्धेचाही सन्मान उरला नाही का? रात्रीच्या अंधारात नोटिसा चिकटवून भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय.
सुपीक जमिनीला 'पडीक' ठरवून सरकार कोणाचे हित साधत आहे? देवेंद्र फडणवीसांना माणसे मारायची आहेत का'? हा वृद्ध शेतकरी नरहरी बापूसाहेब बल्लाळ यांचा सवाल आज महाराष्ट्रातील प्रत्येक भूमिपुत्राच्या मनात आहे.
विकास हवाय, पण तो शेतकऱ्यांच्या रक्तावर आणि अश्रूंवर नको! लोकांनी यासाठी बहुमत दिले का तुम्हाला? असा सवाल करत जनतेचा आवाज दडपणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही महाराष्ट्रात पुन्हा निजामकाळातील जुलूमशाही आली आहे का? असे म्हणत सरकारला धारेवर धरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.