Ambadas Danve News : भुमरे, तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सहीमुळे आमदार झालात हे विसरू नका! अंबादास दानवेंनी सुनावले

Ambadas Danve Political Attack On MP Sandipan Bhumre : संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की, ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते.
Ambadas Danve Criticise Sadipan-Vilas Bhumre News
Ambadas Danve Criticise Sadipan-Vilas Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खासदार संदीपान भुमरे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला.

  2. दानवे म्हणाले, “भुमरे, ठाकरे कुटुंबामुळेच तुम्ही आमदार झाला आहात, हे विसरू नका.”

  3. या वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून राजकीय वातावरण तापले आहे.

Shivsena UBT News : एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाषण करताना खासदार संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे कधी आम्हाला भेटलेच नाही, ते कायम आॅफलाईन, आॅनलाईनच असयाचे. वर्षा बंगला आम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पाहिल, ठाकरे आम्हाला तिथे येऊच देत नव्हते, अशी टीका भुमरेंनी केली होती. या टीकेला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले.

2019 पर्यंत जो उमेदवारी अर्ज भरून तुम्ही आमदार झालात, त्या अर्जावर उद्धव ठाकरे यांचीच सही होती, हे विसरू नका, असा टोला दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना लगावला. तुमच्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य, सभापती पद मिळाले तेही उद्धव ठाकरे यांच्या पक्षानेच दिले होते, याची आठवणही दानवे यांनी करून देत भुमरे पिता-पुत्रांना चिमटा काढला.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गटप्रमुखांचा मेळावा झाला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ म्हणून याकडे बघितले गेले. या मेळाव्यात संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी गेलो तर ते बघतही नव्हते, फक्त नमस्कार करून पुढे निघून जायचे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दीडशे कोटी रुपये दिले,असे सांगत भुमरे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीकास्त्र सोडले होते.

Ambadas Danve Criticise Sadipan-Vilas Bhumre News
Uddhav Thackeray News : इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज ही तर थाप! उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

याला अंबादास दानवे यांनी उत्तर देताना संदीपान भुमरे, विलास भुमरे यांना एकप्रकारे आरसा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करताना संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की, ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते. कोविडचे संकट राज्यावर असताना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून आपल्या रोजगार हमी खात्याचा एक रुपयाही निधी कपात करण्यात आला नव्हता.

Ambadas Danve Criticise Sadipan-Vilas Bhumre News
Ambadas Danve News : महायुतीच्या तीन जादूगारांची हातचलाखी; अंबादास दानवेंकडून पॅकेजचे पोस्टमार्टम

2019 पर्यंत आपण जो निवडणूक उमेदवारी अर्ज भरून आमदार झालात, त्या फॉर्मवर उद्धव ठाकरे साहेबांचीच सही होती. आपले सुपुत्र जिल्हापरिषद सदस्य, सभापती झाले ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडून झाले होते. आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे. कशाला अधिक बोलायला लावता? दानत आणि हिम्मत असेल तर सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी आपण भाग पाडाल! जे तुमच्या आवाक्याबाहेर आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी भुमरेंवर पलटवार केला.

FAQs

1. संदीपान भुमरे यांनी कोणावर टीका केली?
भुमरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली होती.

2. अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
दानवे यांनी भुमरेंना प्रत्युत्तर देत सांगितले की “ठाकरे कुटुंबामुळेच तुम्ही आमदार झालात, हे विसरू नका.”

3. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर झाला?
भुमरेंच्या अलीकडील वक्तव्यांमुळे शिवसेनेतील ठाकरे समर्थक नाराज झाले आणि त्यामुळे वाद पेटला.

4. शिवसेनेतील गटात काय प्रतिक्रिया आहेत?
शिंदे गटाने भुमरेंचा बचाव केला तर ठाकरे गटाने दानवे यांच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले.

5. या वादाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
या वादामुळे दोन्ही शिवसेनेतील तणाव आगामी निवडणुकांपूर्वी वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com