Ambadas Danve News : अंबादास दानवेंनी घातले राज्य सरकारला साकडे; म्हणाले, 'संभाजीनगरसाठी ...'

Political News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने येत्या काळात पाणी टंचाई दूर करण्यासाठी जाणवत आहे.

Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrpati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर करीत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने येत्या काळात पाणी टंचाई दूर करण्यासाठी जाणवत नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडण्यासाठी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे साकडे घातले आहे.

राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. यामुळे पिण्याची पाण्याची व जनावराच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नांदूर - मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडा, अशी मागणी शिवसेना (Shivsena) नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली. (Ambadas Danve News)


Ambadas Danve
Dispute In Mahayuti : खासदार लोखंडे कोण? आमदार काळेंच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नावरून गोंधळ

या तालुक्यात प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तथापि, सदरहू पुरवठा अत्यल्प स्वरूपाचा असल्याने या तालुक्यातील नागरिकांना व जनावराना पाण्याअभावी अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी व अनेक सामाजिक संस्थांकडून प्रशासनाकडे नांदुर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात एक आवर्तन मिळण्याची मागणी केली आहे. तथापि, प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये शासनाप्रती असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. सदरहू बाब गंभीर स्वरूपाची असल्याचा उल्लेख दानवे यांनी या पत्रात केला आहे..तरी उक्त प्रकरणी चौकशी करून संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली पाणी टंचाई सोडविण्याच्या दृष्टीने लवकरच पाणी सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्वरित कारवाई केली जाणार ?

नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात एक आवर्तन सोडण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनापासून एक आवर्तन सोडण्याबाबत त्वरित कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Sachin Waghmare)


Ambadas Danve
Ambadas Danve News : अंबादास दानवे यांना बळ देत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com