Prakash Ambedkar News : आमची अवस्था `मान न मान मै तेरा मेहमान`..

Maharashtra News : स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मित्र पक्षाला बोलावले नाही आणि जाहिर सभेतून इंडीया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करणे हे विसंगत.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi News : राज्यातील `महाविकास आघाडी` आणि देशपातळीवरील `इंडिया` आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक असलेल्या वंचित बहुजन आघाडीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. (Mahavikas Aghadi News) लोकसभा निवडणुका तोंडावर असतांना भाजपला टोकाचा विरोध करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला झुलवत ठेवण्याच्या प्रकारामुळे आंबेडकर संतप्त झाले आहेत.

Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News : 'त्या' भेटीचे गुपित प्रकाश आंबेडकरांनी केले उघड!

अकोला येथे जाण्यापुर्वी छत्रपती संभाजीनगरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी आणि इंडियातील समावेशाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा `आमची अवस्था मान न मान, मै तेरा मेहमान`, अशी झाल्याची खंत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बोलून दाखवली. आम्ही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) प्रस्ताव दिला आहे. त्यावर चर्चा करण्याची तसदीही घेतली जात नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने प्रकाश आंबेडकर यांनी शहरात आढावा बैठकही घेतली. महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घेतलेले नाही, तरीही आम्ही एक फार्म्यूला मांडून प्रस्ताव दिला आहे. (Vanchit Bahujan Aghadi) या प्रस्तावावर चर्चा करणे अपेक्षीत आहे. मात्र चर्चा करण्याऐवजी वंचितने इतक्या जागा का मागीतल्या ? यावर चर्चा सुरु झाली. इंडीया आघाडीतील एकाही पक्षाने अधिकृत प्रस्ताव दिला नाही, आम्ही प्रस्ताव दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्हाला विचारले नाही तरीही आम्ही प्रस्ताव दिला. राजकीय पक्ष म्हणून भूमिका घ्यावी लागते, ही भूमिका कॉंग्रेस पक्ष घेत नाही. मतदारांना बुचकाळ्यात का टाकत आहात? तुम्ही बीजेपीला सकारात्मक वातावरण तयार करत आहात. सरकार जावून अडिच वर्ष झाले, परंतु काँग्रेसने आजपर्यंत लोकसभेच्या राज्यातील 48 मतदारसंघाबद्दल काहीच तयारी केली नाही.

नागपूरातल्या कॉंग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात एकाही मित्र पक्षाला बोलावले नाही आणि जाहिर सभेतून इंडीया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करणे हे विसंगत आहे, अशी टीकाही आंबेडकरांनी केली. यामुळे मतदार कॉंग्रेसला नव्हे तर बीजेपीला मतदान करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar : आंबेडकरांचं 'इंडिया'त सामील होण्यासाठी पत्र, म्हणाले,"मोदींना हटविण्यासाठीच नाहीतर..."

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितसह काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) या चारही पक्षांनी प्रत्येकी बारा जागा लढवाव्यात, अशी मागणी करत खळबळ उडवून दिली होती.

त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना खरचं महाविकास आघाडीचा भाग व्हायचे आहे, की त्यात बिघाडी करायची ? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. तत्पुर्वी लोकसभेच्या आगामी रणनितीबद्दल चर्चा करुन राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी यांना आंबेडकरांनी काही टिप्सही दिल्या. जवळपास पाऊण तास त्यांनी सर्वांशी संवाद साधला.

Edited By : Jagdish Pansare

Prakash Ambedkar News
Mahavikas Aghadi : सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com