sonia gandhi sharad pawar uddhav thackeray
sonia gandhi sharad pawar uddhav thackeraysarkarnama

Mahavikas Aghadi : सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपावर...

Supriya Sule News: महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा फाॅर्म्युला ठरला
Published on

Mumbai : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना 23 जागांवर आणि काँग्रेस 27 जागांवर लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अशा सगळ्या शक्यता फेटाळत महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा फाॅर्म्युला दिल्लीत ठरला आहे. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार, असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

sonia gandhi sharad pawar uddhav thackeray
Kiran Samant News: रोकेगा कौन ? भाजपला चॅलेंज,व्हाॅट्सअपला स्टेट्स ठेवत...

महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यात कोणाला किती जागा, हे सुळे यांनी सांगितले नाही. मात्र, 15 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. मात्र, यावर शिक्कामोर्तब होण्यास काही कालावधी लागेल. त्यानंतर तो जाहीर करू, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांचा समावेश अजून झाला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष्य लागले असताना सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत महत्त्वाचे विधान केले आहे. देशासाठी, संविधानासाठी आंबेडकर परिवाराचे मोठे योगदान आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुळे यांनी महायुतीवर देखील जोरदार हल्ला केला. राज्यात सायबर क्राईम वाढत आहे. गृहमंत्री काय करतात, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या एक-दोन जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com