Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama

MLA Amit Deshmukh News : महाविकास आघाडीच्या यशाने महायुतीची झोप उडाली, परिवर्तन अटळ

Amit Deshmukh claims that the success of the Mahavikas Aghadi made the Mahayuti sleepless : `लाडकी बहीण` सारख्या योजना जाहीर केल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही परंतु `सुरक्षित बहीण` योजना कधी आणणार हा आमचा सरकारला प्रश्न आहे.
Published on

Latur Congress Political News : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या उत्तुंग यशामुळे विद्यमान महायुती सरकारची झोप उडाली आहे, आगामी विधानसभा निवडणुकीतही आपली एकजूट कायम राहिल्यास मराठवाड्यात आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

केंद्र शासनापेक्षा महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जनतेचा अधिक रोष आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (Amit Deshmukh) काँग्रेस आणि मित्र पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यावरून राज्यात परिवर्तन अटळ आहे हे दिसून येत आहे. जागा मर्यादित आणि इच्छुक अधिक असले तरी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी आपला एकोपा कायम ठेवायचा आहे, असे आवाहन देशमुख यांनी केले.

महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महायुतीची झोप उडाली असून `लाडकी बहीण` सारख्या योजना जाहीर केल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही परंतु `सुरक्षित बहीण` योजना कधी आणणार हा आमचा सरकारला प्रश्न आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या तिघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही,कंत्राट वाटण्यात आणि कमिशन गोळा करण्यात या सरकारचे प्रतिनिधी धुंद आहेत.

Amit Deshmukh
MLA Amit Deshmukh : छत्रपतींचा पुतळा कोसळला, अटल सेतू, समृद्धीची तीच गत

हे सर्व चित्र महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे, असा आरोप त्यांनी केला. वाऱ्याने पुतळा पडू शकतो असे आजवर जगभरातले एकही उदाहरण नाही. (Mahavikas Aghadi) त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे.

या परिस्थितीत सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही, हे उघड आहे असा आरोप अमित देशमुख यांनी केला. तंत्रज्ञानात होत असलेल्या संशोधनामुळे ऊसापासून उपपदार्थ निर्मिती आणि त्याच्या वापरात क्रांतिकारी बदल घडून येत आहेत. या परिस्थितीत ऊस शेतीला मोठे भवितव्य असून हे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मराठवाड्यात मोठा वाव असल्याचे देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com